मौनी रॉयचा झाला साखरपुडा? हातात डायमंड रिंग पाहून चाहते गोंधळात

मौनी रॉयचा झाला साखरपुडा? हातात डायमंड रिंग पाहून चाहते गोंधळात

अभिनेत्री मौनी रॉयच्या (Mauni Roy)ची एक सोशल मीडिया पोस्ट पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी असा तर्क लावला आहे की मौनीने आता लग्नाचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑक्टोबर : कोरोना काळात अनेकांनी छोटेखानी विवाह सोहळा करत लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक सेलिब्रिटी देखील या काळात लग्न उरकून घेतले आहे. दरम्यान टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या मौनी रॉयने (Mauni Roy) सोशल मीडियावर अशी एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे तिचे चाहतेच नव्हे तर सहकलाकार देखील आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोकांनी असे तर्क केले आहेत की, मौनीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिने साखरपुडा केला आहे. मात्र तिने शेअर केलेल्या या फोटोमागचं सत्य काहीतरी वेगळं आहे.

मौनी रॉय सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते आणि विविध गोष्टी शेअर करत असते. चाहत्यांसाठी ती तिच्या आयुष्यातील अपडेट देत असते. नुकताच तिने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिच्या हातात डायमंड रिंग आहे. रिंग फिंगरमध्ये तिने ही अंगठी घातल्याने चांहते संभ्रमात पडले आहेत.

खरतंर ही पोस्ट एका साखरपुड्यासाठी खास अंगठी बनवणाऱ्या ब्रँडची जाहिरात आहे. पण मौनीने अशा प्रकारे फोटो पोस्ट करणं चाहत्यांना संभ्रमात टाकणारं होतं. अनेकांना असाच भ्रम झाला की मौनी तिच्या साखरपुड्यातील अंगठीचा फोटो शेअर केला आहे. त्याचप्रमाणे काही चाहत्यांनी तिच्या लग्नाबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे.

(हे वाचा-प्रेक्षकांना भुरळ घालतायंत सुरभी चंदनाचे हे Photos, साडी लुक सोशल मीडियावर VIRAL)

काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) आणि मौनी रॉय यांचे अफेअर सुरू आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 29, 2020, 10:12 AM IST

ताज्या बातम्या