वयाच्या 48 व्या वर्षी आई झाली ही अभिनेत्री; सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा फोटो

वयाच्या 48 व्या वर्षी आई झाली ही अभिनेत्री; सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा फोटो

अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandir Bedi)ने नुकतंच एका मुलीला दत्तक घेतलं आहे. सोशल मीडियावर अकाऊंटवरुन तिने आपल्या मुलीचा फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर हॉट आणि बोल्ड अदांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi)ने एक कौतुकास्पद पाऊल उचचलं आहे. वयाच्या 48व्या वर्षी तिने पुन्हा आई होण्याच्या निर्णय घेतला आहे. पण ती स्वत: बाळाला जन्म देणार नाही तर तिने एक मुलगी दत्तक घेतली आहे. सोशल मीडियावरुन स्वत: तिने ही माहिती दिली. 28 जुलै 2020 रोजी मंदिराच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

मंदिराने दत्तक घेतलेली मुलगी 4 वर्षाची आहे. मंदिराने दत्तक घेतलेल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिने छानसं कॅप्शनही लिहलं आहे, “ही माझी छोटी मुलगी तारा 28 जुलै 2020 पासून ती आमच्या कुटुंबाची सदस्य झाली आहे. ही वीरची ही लहान बहीण. तिच्या डोळ्यात एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमक आहे. ” तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा नवरा, मुलगा ती स्वत: आणि छोटी तारा दिसत आहे. यात त्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत.

मंदिराने हा फोटो शेअर केल्यावर अनेक सेलिब्रिटी आणि फॅन्सच्या कॉमेंट्स येऊ लागल्या. अनेकांनी तिचं अभिनंदन केलं. तिच्या चाहत्यांनी तिचं भरभरुन कौतुकही केलं आहे. मंदिरा बेदीने शांती सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होते. सुपरहिट चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐगें'मध्येही ती झळकली होती. 'साहो' या चित्रपटामध्ये तिने काम केलं होतं. त्यानंतर मंदिरा मोठ्या पडद्यापासून काहीशी लांब आहे.   अभिनेत्री मंदिरा बेदीचं लग्न 1999 साली दिग्दर्शक राज कौशलशी झालं होतं. लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनी तिला मुलगा झाला. आता तिचा मुलगा वीर 9 वर्षाचा आहे. एका मुलाखतीमध्ये तिने मुलगी दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता मंदिराच्या घरी मुलीचं आगमन झालं आहे. त्यामुळे तिचं कुटुंब अतिशय खूश आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 26, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading