मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बापरे! एकाच चित्रपटात 17 किसिंग सीन देत अभिनेत्रीने माजवली होती खळबळ

बापरे! एकाच चित्रपटात 17 किसिंग सीन देत अभिनेत्रीने माजवली होती खळबळ

 अभिनेत्रीने आपल्या एकाच चित्रपटात 1... 2 नव्हे तर तब्बल 17 किसिंग सीन देत सर्वांनाच धक्का दिला.

अभिनेत्रीने आपल्या एकाच चित्रपटात 1... 2 नव्हे तर तब्बल 17 किसिंग सीन देत सर्वांनाच धक्का दिला.

अभिनेत्रीने आपल्या एकाच चित्रपटात 1... 2 नव्हे तर तब्बल 17 किसिंग सीन देत सर्वांनाच धक्का दिला.

मुंबई, १० सप्टेंबर- बॉलिवूडमध्ये (Bollywood) कलाकरांना स्क्रिप्टची गरज म्हणून अनेक असे सीन द्यावे लागतात, जे सर्वसामान्य लोकांना थक्क करून सोडतात. तसेच अनेक अभिनेत्री असे सीन द्यायला नकार देतात. तर काही अभिनेत्री बिनधास्त असे सीन देतात. त्यात किसिंग सीनचा प्रामुख्याने समावेश होतो. अभिनेता एखाद्या चित्रपटात किसिंग सीन दिला तर लगेच त्याची चर्चा सुरु होते. मात्र बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या एकाच चित्रपटात 1...2 नव्हे तर तब्बल 17 किसिंग सीन देत सर्वांनाच धक्का दिला.

एकाच चित्रपटात तब्बल १७ किसिंग सीन देत खळबळ माजवणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) होती. मल्लिका शेरावतला बॉलिवूडमधील सर्वात हॉट अँड बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखलं जात. तिच्या प्रत्येक चित्रपटात तिने असे सीन दिले आहेत. मात्र २००३ मध्ये आलेल्या 'ख्वाहिश' या चित्रपटात तिने १७ किसिंग सीन देत, एकाच चित्रपटात इतके किसिंग सीन देणारी ती पहिली अभिनेत्री ठरली होती.

(हे वाचा:OMG! शाहीरने LEAK केलं सीक्रेट; अंकिता लोखंडे लवकरच विकीसोबत करणार लग्न)

'ख्वाहिश' या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री मल्लिका शेरावत होती. तर त्याचा सहकलाकार म्हणून अभिनेता हिमांशू मलिक होता. हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. त्यांनतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. अभिनेत्याच्या वडिलांचा या लग्नाला विरोध असतो. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जाऊन ते लग्न करतात. आणि त्यांनतर सुरु होते त्याची खरी परीक्षा असा हा एकंदरीत चित्रपट होता. यामध्ये शिवाजी साटम यांनी हिमांशूच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

(हे वाचा:Beauty Queen यामी गौतमने चाहत्यांना पुन्हा केलं घायाळ; Bhoot Police...)

मल्लिका शेरावतचं खरं नाव रीमा लांबा असं आहे. मात्र चित्रपटात आल्यानंतर तिने मल्लिका शेरावत या नावाने ओळख मिळवली आहे. मल्लिकाने मर्डर, हिस्स, जीना सिर्फ मेरे लिये, बचके रेहना रे बाबा, किस किस कि किस्मत अशा विविध चित्रपटात काम केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Entertainment