मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मलायका अरोराने 26 दिवसांनंतर दाखवली आपली जखम,कार अपघातामुळे झाली होती Injury

'मलायका अरोराने 26 दिवसांनंतर दाखवली आपली जखम,कार अपघातामुळे झाली होती Injury

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात झाला होता. (Malaika Arora accident). तिच्या कारला दुसऱ्या गाडीने धडक दिली होती. ज्यामध्ये अभिनेत्री जखमी झाली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,29 एप्रिल- काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात झाला होता. (Malaika Arora accident). तिच्या कारला दुसऱ्या गाडीने धडक दिली होती. ज्यामध्ये अभिनेत्री जखमी झाली होती, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खालापूर टोलनाक्यावर ही घटना घडली होती. त्यानंतर मलायकाला नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं(Malaika Arora latest news).

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक झालं होतं. त्यावेळी काही गाड्या एकमेकांना धडकल्या. तीन-चार गाड्यांची टक्कर झाली. खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला होता. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये मलायकाची कारही होती. गाडीला अपघात झाला तेव्हा मलायका गाडीत होती. अपघातात ती जखमी झाली होती. सुदैवाने थोडक्यात ती बचावली. तिला लगेच नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.या घटनेला आता तब्बल २६ दिवस लोटले आहेत. आता अभिनेत्री यातून सावरली आहे.

मलायका अरोराने 2 एप्रिल रोजी झालेल्या अपघातानंतर काही दिवस कामातून ब्रेक घेतला होता. पण आता दुखापतीतून सावरल्यानंतर ती पुन्हा कामावर परतली आहे. मलायका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. दुखापतीनंतर काही दिवसांनी तिने चाहत्यांना या अपघाताबाबत सांगितलं होतं. मात्र आपली दुखापत दाखवली नव्हती. आता अभिनेत्रीने आपला एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या जखमेचे व्रण दाखविले आहेत.

मलायकाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या कपाळावर दुखापतीच्या खुणा दिसत आहेत. मलायका आजपर्यंत नेहमीच तिची जखम लपवताना दिसली आहे. आता पहिल्यांदाच मलायकाने असा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या कपाळावर जखमेचे व्रण स्पष्टपणे दिसत आहे. फोटोमध्ये तिच्या डोळ्याजवळची खूण स्पष्टपणे दिसत आहे. सेल्फीमध्ये मलायका कारमध्ये बसलेली दिसत असून तिने सनग्लासेससुद्धा लावले आहेत. फोटोसोबत अभिनेत्रीने लिहिलंय - 'चांगुलपणा आणि कोलेजनने भरलेल्या माझ्या ग्रीन ज्यूसशिवाय नाही'.अभिनेत्री किती फिटनेस फ्रिक आहे हे सर्वानांच माहिती आहे. त्यामुळे ती नेहमीच हेल्थी ड्रिंक्स आणि फूडवर भर देते.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Malaika arora