मुंबई, 1 जून- वयाच्या 47 व्या वर्षीही अत्यंत फिट असणारी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा (Malaika Arora) काही महिन्यांपूर्वी कोविड-19 मधून (Covid-19) बाहेर पडली. त्यानंतर पुन्हा आपला फिटनेस (Fitness) तिनं मिळवला असून त्याचे फोटो तिनं अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केले होते. फिटनेससाठी अथक मेहनत घेणाऱ्या मलायकानं कोविडमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पूर्वीचा फिटनेस मिळवण्याचा प्रवास अतिशय कठीण असल्याचं म्हटलं आहे. याबाबत एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे (Instagram) तिनं आपला हा सगळा अनुभव शेअर केला आहे. तब्बल 32 आठवड्यांच्या प्रयत्नानंतर ती पुन्हा एकदा पूर्वीसारखीच झाली आहे. तिचं पूर्वीचं रुटीन सुरू झाल्याचं तिनं म्हटलं आहे. हा काळ अतिशय अवघड होता; पण अनेकांचा आधार, प्रोत्साहन आणि उंदड आशावाद यामुळं आपण यातून बाहेर पडल्याचं तिनं सांगितलं आहे.
View this post on Instagram
वन इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, ‘मी नेहमी ऐकते की तू किती लकी आहेस, तुझ्यासाठी अनेक गोष्टी किती सोप्या आहेत. खरंच, माझ्या आयुष्यातीलया अनेक गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे. पण यात नशीबाचा भाग कमी आहे आणि हे सगळं सोपं कधीच नव्हतं,’ असं मलायकानं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
5 सप्टेंबर रोजी तिला कोविड-19 झाल्याचं स्पष्ट झालं होतं. कोविड-19 मधूनबाहेर पडणं सोपं आहे असं सगळे सांगत होते. पण एकतर तुमची प्रतिकार शक्ती (Immunity) चांगली असेल किंवा कोविडशी तुम्ही सामना केलेला नसेल तर सांगणे सोपे आहे, असं तिनं म्हटलं आहे. ‘मला कोविडमुळं प्रचंड थकवा आला होता. दोन पावलं चालणे सुध्दा मला कठीण जात होतं. बेडवरून उठून खिडकीपर्यंत जाणं, खिडकीशी काही वेळ उभं राहणंदेखील मोठं वाटत होतं. घरच्यांपासून दूर मला अगदी एकटं वाटत होतं.
(हे वाचा:'सोनू सूदला पंतप्रधान करावं' राखी नंतर हुमा कुरेशीने व्यक्त केली इच्छा )
अखेर 26 तारखेला माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि मला हुश्श वाटलं; पण माझं शरीर मला साथ देत नव्हतं. मी पूर्वीसारखी सगळी कामं करू शकेन का, याची मला शंका वाटू लागली होती. पहिल्या दिवशी मी काहीही व्यायाम करू शकले नाही. दुसऱ्या दिवशी मात्र मी निश्चय केला आणि व्यायाम करायला सुरुवात केली. माझी कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तब्बल 32 आठवड्यांनी मी पुन्हा पहिल्यासारखी झाली आहे असं मला वाटतेय.
(हे वाचा: त्या' NUDE सीनपूर्वी राधिका आपटेशी अशी झाली होती चर्चा,आदिल हुसैनचा मोठा खुलासा')
आता मी पूर्वीसारखाच व्यायाम करू शकते, सहजपणे श्वास घेऊ शकते. शारीरिक (Physical) आणि मानसिक दृष्ट्या (Mental Health) मी आता पहिल्यासारखी तंदुरुस्त झाले आहे. आशावादी (Hope) राहिल्यानं या सगळ्या परिस्थितीवर मी मत करू शकले. काही नीट घडत नसेल तरी पुढं घडेल या आशेवर माणूस पुढं जात असतो. मीसुद्धा त्याच आशेनं पुढं जात राहिले आणि माझं आधीचं आयुष्य पुन्हा मिळवलं,’ असंहीतिनं म्हटलं आहे.
या काळात आधार, प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्यांचे तिनं आभार मानले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Fitness, Malaika arora