मुंबई, 17 जुलै- अभिनेत्री आणि खेळाडूंची बरीचं प्रेमप्रकरणं आपण पाहिली आहेत. सध्या टेनिसपटू लिएंडर पेस (Liendar Pes) आणि ‘मोह्ब्बत्तें’ फेम अभिनेत्री किम शर्माच्या (Kim Sharma) रिलेशनशिपची बरीच चर्चा सुरु आहे. नुकताच या दोघांना गोव्यामध्ये एकत्र सुट्टीचा आंनद घेताना पाहण्यात आलं आहे. या दोघांची फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चांना उधान आलं आहे. याआधी लिएंडर पेस अभिनेत्री महिमा चौधरीसोबत (Mahima Chaudhari) रिलेशनशिपमध्ये होता. आत्ता महिमा चौधरीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री महिमा चौधरी सध्या बंगाली चित्रपटामध्ये झळकणार आहे. ‘डार्क चॉकलेट’ असं या चित्रपटाचं नाव आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच निमित्ताने दिलेल्या एका मुलाखती दरम्यान महिमाने म्हटलं आहे, की ‘लिएंडरने तिला धोका दिला होता. तो एक चांगला खेळाडू तर आहे, मात्र एक चांगला माणूस नाही’, असं म्हटलं जातं, की लिएंडरने महिमा चौधरीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना अभिनेता संजय दत्तची पहिली पत्नी रिया पिल्लईसोबतसुद्धा जवळीक वाढवली होती.
(हे वाचा: भूषण कुमार बलात्कार प्रकरणामध्ये T-Series ने दिली पहिली प्रतिक्रिया)
पुढे महिमाने म्हटलं आहे, ‘जेव्हा मला समजलं की लिएंडरच्या आयुष्यामध्ये माझ्या व्यतिरिक्त अजूनही कोणी आहे, तेव्हा मला धक्का बसला होता. मी त्याच्यापासून विभक्त झाले. मात्र मला माहिती होतं. जे त्यांनी आज माझ्यासोबत केलं आहे, तेच पुढ रियासोबतही करणार. आपल्याला सांगू इच्छितो की, महिमापासून विभक्त झाल्यानंतर लिएंडर गर्लफ्रेंड रियासोबत विदेशात लिव्हइन मध्ये राहात होता.
(हे वाचा:'एवढं काय हिच्या प्रेग्नेन्सीचं कौतुक' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अभिनेत्रीचं उत्तर )
अभिनेत्री महिमा चौधरीने 2006 मध्ये लग्नं केलं होतं. आर्कीटेक्त बॉबी मुखर्जी हा महिमाचा पती आहे. मात्र 2006 मध्ये ते विभक्त झाले आहेत. त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. मात्र आपल्या मुलींचा सांभाळ महिमा एकटीच करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood