Home /News /entertainment /

VIDEO: 'एक बार पेहरा..' वर माधुरीचा धम्माल डान्स; सोबत धर्मेश आणि रिषभही थिरकले

VIDEO: 'एक बार पेहरा..' वर माधुरीचा धम्माल डान्स; सोबत धर्मेश आणि रिषभही थिरकले

नुकताच माधुरीने सोशल मीडियावरचा नवा ट्रेंड जॉईन करत ‘एक बार पेहरा हटा दे’ गाण्यावर धम्माल डान्स (Dance Video) केला आहे.

  मुंबई, 16 जुलै- वयाच्या पन्नाशीतही धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तितकीच सुंदर आणि सक्रीय आहे. प्रत्येकवेळी एखाद्या नवख्या अभिनेत्रीसारखा उत्साह तिच्यामध्ये दिसून येतो. अभिनेत्री सोशल मीडियावरसुद्धा खुपचं सक्रीय असते. ती सतत नवनवीन रील (Reel) बनवत असते. नुकताच माधुरीने सोशल मीडियावरचा नवा ट्रेंड जॉईन करत ‘एक बार पेहरा हटा दे’ गाण्यावर धम्माल डान्स (Dance Video) केला आहे. इतकचं नव्हे तर तिने कोरियोग्राफर धर्मेश आणि रिषभ कालरालासुद्धा थिरकायला भाग पाडलं आहे.
  अभिनेत्री माधुरी दीक्षितला बॉलिवूडची धकधक गर्ल म्हटलं जातं. कारण तिचं अभिनय आणि सौंदर्य तसंचं आहे. ती आज वयाच्या पन्नाशीत आहे. मात्र तिचा उत्साह थोडासादेखील कमी झालेला नाहीय. उलट वय वाढल तसं ती आणखीनचं तरुण होतं आहे. माधुरीचं फिटनेस आणि सौंदर्य एखाद्या तरुण अभिनेत्रीला टक्कर देईल असंच आहे. माधुरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती आपले सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते. इतकच नव्हे तर ती सतत नवनवीन रील बनवत असते. आणि हे रील प्रचंड पसंतदेखील केले जातात. (हे वाचा: HBD: सलमान आणि रणबीर कपूरला सोडून कतरिना विक्की कौशलशी करणार लग्न?) नुकताच माधुरीने सोशल मीडियावरचा नवीन ट्रेंड जॉईन करत, ‘एक बार पेहरा हटा दे’ गाण्यावर धम्माल डान्स केला आहे. आणि सोबतचं धर्मेश आणि रिषभ कालरादेखील आपल्यासोबत नाचण्यास भाग पाडलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. धकधक गर्लचा हा अंदाज पाहून सर्वांनाचं डान्स करण्याचा मोह आवरत नाहीय. (हे वाचा:एक वर्षसुद्धा नाही टिकलं पहिलं लग्नं; खुपचं बेचव होतं लग्नाचं कारण : नीना गुप्ता ) माधुरी सध्या कलर्स वाहिनीवरील ‘डान्स दिवाने 3’ या शोमध्ये परीक्षक आहे. माधुरी अभिनेत्रीसोबतचं स्वतः एक उत्तम डान्सर आहे. तिच्या डान्सचे चाहते आजही दिवाने आहेत. या शोमध्ये ती सतत मजामस्ती करताना दिसून येते. तिच्यासोबतच धर्मेश आणि रिषभ कालरासुद्धा या शोचे परीक्षक आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Madhuri dixit

  पुढील बातम्या