मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : 'डान्स दिवाने 3' च्या सेटवर माधुरी दीक्षित Vs नोरा फतेही; पाहा कोणी मारली बाजी

VIDEO : 'डान्स दिवाने 3' च्या सेटवर माधुरी दीक्षित Vs नोरा फतेही; पाहा कोणी मारली बाजी

नुकताच माधुरीचा ‘डान्स दिवाने 3’(Dance Diwane 3) या कार्यक्रमातील डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती ‘प्यार दो’ या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे.

नुकताच माधुरीचा ‘डान्स दिवाने 3’(Dance Diwane 3) या कार्यक्रमातील डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती ‘प्यार दो’ या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे.

नुकताच माधुरीचा ‘डान्स दिवाने 3’(Dance Diwane 3) या कार्यक्रमातील डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती ‘प्यार दो’ या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 24 एप्रिल- बॉलीवूडची (Bollywood) धकधक गर्ल (Dhakdhak) माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) नेहमीच आपल्या अंदाजाने सर्वांना भुरळ पाडते. पन्नाशी पार केलेली माधुरी आजही तितकीच तरुण आणि ऍक्टिव्ह दिसून येते. तिचं सौंदर्य आणि अदाकारी आजच्या तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. माधुरी जितकी उत्तम अभिनेत्री आहे, तितकीच ती उत्तम डान्सर देखील आहे. तिच्या डान्सचे चाहते अक्षरशः वेडे आहेत. नुकताच माधुरीचा ‘डान्स दिवाने 3’(Dance Diwane 3) या कार्यक्रमातील डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती ‘प्यार दो’ या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे.

माधुरी दीक्षित सध्या डान्स दिवाने 3 या कार्यक्रमामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. माधुरी सतत आपल्या डान्सची झलक यामध्येसुद्धा दाखवते. येणारा प्रत्येक कलाकार माधुरी सोबत डान्स करण्यास उत्सुक असतो. नुकताच माधुरी आणि नोरा फतेहीने डान्स दिवानेच्या स्टेजवर धम्माल डान्स केला आहे. या दोन्ही अभिनेत्रींच्या मध्ये एक मजेशीर कॉम्पीटीशन घेण्यात आलं होतं. यावेळी नोराने माधुरीच्या प्रसिद्ध ‘चोली के पीछे’ या ‘खलनायक’ चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. तर याचवेळी माधुरी दीक्षितने ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या ‘जांबाज’ या चित्रपटातील ‘प्यार दो, प्यार लो’ या गाण्यावर डान्स केला आहे.

" isDesktop="true" id="543695" >

यावेळी सेटवरील सर्वजण उठून माधुरी दीक्षितला चिअरअप करत होते. आणि त्यांच्या या अदाकारीचा आनंद घेत होते. आत्तासुद्धा माधुरी दीक्षित यांच्या मध्ये असलेला जोश पाहून चाहते हैराण आहेत. हा डान्स पाहून सर्वजण माधुरीवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. नोरा पेक्षा माधुरीचं कशी बेस्ट आहे. हे चाहते कमेंट करून सांगत आहेत. काहींनी तर माधुरीसमोर नोराचा डान्स काहीचं नसल्याचं म्हटलं आहे.

(हे वाचा: सुपरस्टार सलमान खानने 'या' अभिनेत्रीमुळे चित्रपटांत दिला नाही Kissing Scene, )

नुकताच डान्स दिवाने 3 च्या सेटवर कोरोनाचा उद्रेक झाला होता. तब्बल 18 जण कोरोना पॉजिटीव्ह आले होते. त्यानंतर सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच या कार्यक्रमातील आणखी एक परीक्षक धर्मेश येलांडेला कोरोनाची लागण झाली होती. तर त्याच्या पाठोपाठ कार्यक्रमाचा होस्ट राघव जुयाल याला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. माधुरी दीक्षित, धर्मेश येलांडे सोबत रिषभ कालरासुद्धा या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

First published:

Tags: Bollywood, Madhuri dixit, Marathi entertainment