Home /News /entertainment /

ही बॉलिवूड अभिनेत्री तिसऱ्यांदा होणार आई, बिकिनी PHOTO SHOOT मधल्या Baby Bump चे फोटो झाले व्हायरल

ही बॉलिवूड अभिनेत्री तिसऱ्यांदा होणार आई, बिकिनी PHOTO SHOOT मधल्या Baby Bump चे फोटो झाले व्हायरल

अनुष्का, करिना नंतर बॉलिवुडची (Bollywood) आणखी एक अभिनेत्री आई होणार आहे. अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) ने आपल्या तिसऱ्या बाळाची माहिती चाहत्यांना दिली आहे.

  मुंबई, 27 मार्च : अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) ही आई होणार असून तिच्या बेबी बम्प चे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. (bollywood actress Lisa haydon flaunting baby bump) लिसा ही तिसऱ्यांदा आई होत असून तिला दोन मुलं आहेत. एका मुलाखतीत लिसाने आपण मातृत्वाचा आनंद घेत असल्याचं म्हटलं होतं. तर कुटुंबासोबत वेळ घालवणं ही पसंत करत असल्याचे ती म्हणाली होती. लिसाने तिच्या मागच्या मॅटरनिटी शूट (maternity shoot) ने सगळ्यांनाच इम्प्रेस केलं होत. तर या वेळीही तिने एका समुद्र किनाऱ्यावर बिकीनी शूट (Lisa haydon bikini photo shoot) करत बेबी बम्प (baby bump) फ्लॉन्ट केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा देखिल दिल्या आहेत. लिसा ने 2016 साली दिनो लालवानी (Dino Lalvani)  याच्याशी विवाह केला होता आणि त्यानंतर ती जास्तीत जास्त काळ हा ऑस्टेलिया मधे घालवत होती. लिसाने 2017 मधे पहिल्या मुलाला दिला होता. आणि त्यानंतर तिने कुटुंबाला वेळ देण्यासाठी फिल्मी दुनियेपासून ब्रेक घेतला होता. 2020 मधे तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला तर आता ती पुन्हा एकदा आई होणार आहे. जॅक आणि लिओ अशी तिच्या मुलांची नावं आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

  लिसा ने आपण लवकरच कमबॅक कऱणार असल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होत. लिसा ने रास्कल्स (rascals), क्वीन (queen along with kangana), हाऊसफुल 3 (housefull 3), ये दिल है मुश्कील (ye dil hai mushkil), आयशा (Aaisha) या हिंदी चित्रपटांमधे काम केल आहे.

  चर्चा तर होणारच! डिनर पार्टीसाठी मलायकाने घातलेल्या या रेड आउटफिटची किंमत ऐकून व्हाल थक्क

  याशिवाय लिसा ची मॉडेल म्हणून ही इंडस्ट्रीत ओळख आहे. MTV वरील Indias Next Top Model season 1 या रियलिटी शो (reality show) मधे देखिल तिने जज ची भूमिका साकारली होती. लिसा ही फिटनेस फ्रिक असून ती योग आसने करते. त्यामुळे प्रेग्नसी नंतरही लिसा अतिशय फिट आहे. तर इंन्स्टाग्राम अकाउंटवर ती नेहमीच सक्रिय असते.

   

  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Pregnancy, Small baby

  पुढील बातम्या