Home /News /entertainment /

Bollywood Actress Lesbian Role: आतापर्यंत 'या' अभिनेत्रींनी साकारलीय लेस्बियन भूमिका

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या मराठी सिनेसृष्टीच चर्चेचा विषय बनली आहे. याच कारण म्हणजे नुकतीच रिलीज झालेली तिची रानबाजार (Ranbaazaar) ही वेब सिरीज. याव्यतिरिक्त प्राजक्ता पुन्हा चर्चेत आलीय ते म्हणजे तिच्या रिस्पेक्ट (Respect) या सिनेमामुळे. प्राजक्ता यात समलैंगिक भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात तिला साथ दिलीय अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने. समलैंगिक भूमिका असणारा मराठीतील पहिला सिनेमा आहे. या आधी मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिने सिटी ऑफ ड्रिममध्ये समलैंगिक भूमिका साकारली होती. त्यानंतर आता प्राजक्ता आणि ऋतुजा ही भूमिका साकारत आहे. मराठीतील हा पहिलाच प्रयोग असला तरी याआधी बॉलिवूडमध्ये अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी ही समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली आहे. कोण आहेत त्या अभिनेत्री जाणून घ्या.

पुढे वाचा ...
  अभिनेत्री सोनम कपूर हिने 2019मध्ये रिलीज झालेल्या 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' सिनेमात लेस्बियनची भूमिका साकारली होती. सोनमसह सिनेमात राजकुमार राव आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते.

  माधुरी दीक्षित आणि हुमा कुरैशी यांनी 'डेढ इश्किया' सिनेमात लेस्बियन भूमिका साकारली होती.

   शबाना आझमी आणि नंदिता दास यांनी 'फायर' सिनेमात साकारलेली लेस्बियनची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

  1996 साली फायर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेमात शबाना आणि नंदिता यांचा किसिंग सीन शुट करण्यात आला होता. या सीनची प्रचंड चर्चा झाली होती.

  नुकत्याच रिलीज झालेल्या 'ह्यूमन' या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री कृती कुलकर्णी आणि शेफाली यांनी देखील लेस्बियन भूमिका साकारली होती.

  कल्कि केंकला आणि सयानी गुप्ता यांनी 'मार्गरीटा विद ए स्ट्रॉ' मध्ये लेस्बियन भूमिका साकारली होती. हा सिनेमा एक रोमँटीक ड्रामा होता.

   2004मध्ये आलेल्या 'गर्लफ्रेंड' या सिनेमात अभिनेत्री अमृता अरोरा आणि ईशा कोप्पीकर यांनी देखील लेस्बियन भूमिका निभावली होती.

  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Entertainment

  पुढील बातम्या