मुंबई, 11 ऑगस्ट- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) सध्या आपल्या ‘बेलबॉटम’ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आली आहे. या चित्रपटातील तिच्या ट्रान्सफॉरमेशनने सर्वांनाचं चकित करून सोडलं आहे. या नव्या लुकमध्ये तिला ओळखणंदेखील कठीण झालं आहे. तर दुसरीकडे लारा आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताचं लाराने आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या(Ranbir Kapoor) लग्नाबद्दल एक मोठी हिंट दिल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र यावर लारा दत्ताने ट्वीट करत खुलासा केला आहे.
As lovely a couple as both these actors make, I’m certainly no seer or soothsayer to predict any such thing! Media needs to stop putting words in our mouth and coming up with completely nonsensical news! https://t.co/ltwbTJthnh
— Lara Dutta Bhupathi (@LaraDutta) August 10, 2021
लाराने यासंदर्भात ट्वीट करत म्हटलं आहे, ‘ हे दोघे कलाकार खुपचं उत्तम कपल आहेत. मात्र या दोघांच्या नात्याबद्दल मी कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी केलेली नाही. माध्यमांनी थांबायला हवं. माझ्या तोंडात ते शब्द अजिबात घालू नका जे मी कधी बोललेचं नाहीय. तुमची ही बातमी एकदम फालतू आहे. मी असं काहीही म्हटलं नाहीय’. लाराने ट्वीट करत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. असं म्हटलं जातं होतं की लाराने आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तयारीबद्दल महत्वाची भविष्यवाणी केली आहे. मात्र लाराने ट्वीट करत, या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
(हे वाचा:नीना गुप्तांच्या लेकीचा बोल्ड लुक; पाहा मसाबाचे सुपरहॉट PHOTOS )
लारा दत्ता लवकरच ‘बेलबॉटम’ या बहुचर्चित चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट सध्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये लारा दत्तासोबत अक्षय कुमार आणि हुमा कुरैशीसारखे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये एका विमानाला हायजॅक केल जातं. यामध्ये अक्षय कुमार अंडरकव्हर एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच लारा दत्ता माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या लाराचा इंदिरा गांधींच्या रूपातील लुक मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment