मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

डेटिंग अ‍ॅपवर स्वतःचं प्रोफाइल पाहून चकित झाली लारा दत्ता; VIDEO शेअर करत दिली प्रतिक्रिया

डेटिंग अ‍ॅपवर स्वतःचं प्रोफाइल पाहून चकित झाली लारा दत्ता; VIDEO शेअर करत दिली प्रतिक्रिया

बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता  (Lara Dutta)  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  ती कोणत्याही चित्रपटामुळे, सोशल मीडिया पोस्टमुळे किंवा आगामी प्रोजेक्टमुळे नाही. तर, एका डेटिंग साइटवरील तिच्या प्रोफाइलमुळे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 9 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता  (Lara Dutta)  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  ती कोणत्याही चित्रपटामुळे, सोशल मीडिया पोस्टमुळे किंवा आगामी प्रोजेक्टमुळे नाही. तर, एका डेटिंग साइटवरील तिच्या प्रोफाइलमुळे. हे एकमेव असे कारण होते, ज्यामुळे लारा दत्ताला इंस्टाग्रामवर लाईव्ह यावे लागले आणि डेटिंग साइटवरील तिच्या प्रोफाइलबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागले. वास्तविक, लारा दत्ताची डेटिंग साइटवर प्रोफाईल असल्याची अफवा अचानक उफाळून आली आहे.

अभिनेत्री लारा दत्ता स्वत: देखील डेटिंग साइटवर तिचं  प्रोफाइल पाहून आश्चर्यचकित झाली आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना सत्य सांगण्यासाठी तिने सोशल मीडियाची मदत घेतली. इंस्टाग्रामवर लाईव्ह आल्यानंतर लारा दत्ताने तिच्या चाहत्यांना या बनावट आयडीबद्दल माहिती दिली आणि स्वतःबद्दल पसरलेल्या अफवांचे स्पष्टीकरणही दिले.

लाईव्हमध्ये काय म्हणाली लारा दत्ता-

तिने या संदर्भात एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांना सांगत आहे की तिचे कोणत्याही प्रकारच्या डेटिंग साइटवर कोणतेही प्रोफाइल नाही. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- 'डेटिंग साइट?? मी??? खोटे की सत्य???'' व्हिडिओमध्ये लारा देखील अशा अफवांवर हसताना दिसत आहे. आता तिचे चाहते आणि सेलिब्रिटी मित्रही लारा दत्ताच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, सैफ अली खानची बहीण आणि बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खानने लिहिले - 'हाहाहा... मला हे प्रोफाईल पहायचे आहे.' तर अनन्या पांडेची काकू डीन पांडेने लाल हार्ट

इमोजीसह लाराच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

(हे वाचा:विकी-कतरिना अन् आलिया-रणबीरच नव्हे तर सिद्धार्थ-कियाराचीही सुरुये लगीनघाई? वाचा )

लारा दत्ता यापूर्वी अक्षय कुमार आणि वाणी कपूर स्टारर 'बेल बॉटम' या चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आली होती. यामध्ये लारा दत्ता माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली होती.  आणि तिने आपल्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. यामध्ये लारा हुबेहूब इंदिरा गांधींसारखी दिसत होती.  ज्यासाठी तिच्या मेकअप आर्टिस्टचेही खूप कौतुक झाले होते.लारा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा कस दाखवून दिला आहे. अभिनेत्री लग्नानंतर काही वर्षे पडद्यापासून दूर होती. आता पुन्हा एकदा ती सक्रिय झाली आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment