मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

क्रिती सेननला झाली दुखापत:अभिनेत्रीला अशा अवस्थेत पाहून चाहते चिंतेत

क्रिती सेननला झाली दुखापत:अभिनेत्रीला अशा अवस्थेत पाहून चाहते चिंतेत

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या खूपच व्यस्त आहे. ती सतत आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या खूपच व्यस्त आहे. ती सतत आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या खूपच व्यस्त आहे. ती सतत आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त दिसून येत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 2ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Senon) सध्या खूपच व्यस्त आहे. ती सतत आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त दिसून येत आहे. मात्र नुकताच अभिनेत्री मुंबईमध्ये एके ठिकाणी दिसून आली. यावेळी तिने डेनिम शॉर्ट्स आणि कलरफुल शर्ट टॉप घातला होता. या लुकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान तिच्या लूकपेक्षा जास्त दुसर्या गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आणि ती गोष्ट होती क्रिती सेननची दुखापत. अभिनेत्रीने आपल्या गुडघ्यावर नी कॅप घातलं होतं. या दुखापतीमुले तिला व्यवस्थित चालताही येत नव्हतं.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

अभिनेत्री क्रिती सेनन नुकताच मुंबईमध्ये एके ठिकाणी स्पॉट करण्यात आली. यावेळी तिच्या पायात दुखापत झाल्याचं दिसून आलं. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांना अभिनेत्रीची चिंता वाटू लागली आहे. क्रितीने आपल्या गुडघ्याला आधार देण्यासाठी एक मजबूत असं नी कॅप चढवलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार क्रिती सेननची दुखापत पाहून डॉक्टरांनी तिला काही दिवस अराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तिच्या गुडघ्याची दुखापत लवकरात लवकर बारी होईल. फोटो सोशल मीडियावर येताच चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत, आणि लवकरात लवकर बरं होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, क्रिती सेननच्यासंबंधी सूत्रांनी माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या उजव्या गुडघ्यात दुखापत झाली आहे. तिच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटमध्ये ओढ पडली आहे. त्यामुळे गुडघ्याला थोडी सूज आली आहे. म्हणून गुडघ्याला आधार देण्यासाठी तिला नी कॅपचा वापर करण्यास सांगितलं आहे. तसेच अभनेत्रीला आराम करण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे ती जलदगतीने यातून बरी होऊ शकेल.

(हे वाचा:War'ला दोन वर्षे पूर्ण; हृतिकसह टायगरने श्रॉफने शेअर केल्या आठवणी)

क्रिती सेनन सध्या आपला आगामी चित्रपट 'गणपत'साठी मोठी मेहनत घेत आहे. यासाठी ती सतत सराव करताना दिसत आहे. नुकताच क्रितीने सेनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला होता. त्याला कॅप्शन देत तीन लिहिलं होतं, 'प्रेप... प्रेप... प्रेप, पण आधी वार्मअप'

First published:

Tags: Entertainment, Kriti sanon