मुंबई, 26 मार्च- ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी
(Meena Kumari) या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेत्री होत्या. त्यांनी आपला अभिनय आणि चमकदार व्यक्तिमत्त्वाने लोकांच्या हृदयाला स्पर्श केलं आहे. आता मीना कुमारी यांच्यावर बायोपिक बनवणार असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टी-सीरीज एका दिग्गज कलाकारावर बायोपिक बनवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. आणि क्रिती सेननला
(Kriti Sanon) मीना कुमारीची भूमिकेसाठी विचारणा करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
ETimes च्या रिपोर्टनुसार, क्रिती सेननने अद्याप चित्रपट साइन केलेला नाही. परंतु ती या ऑफरबद्दल नक्कीच फार आनंदी आहे. अशीही चर्चा आहे की, ही आनंदाची बातमी अभिनेत्रीने फक्त त्या लोकांशी शेअर केली आहे ज्यांच्यावर तिचा पूर्ण विश्वास आहे.
मीना कुमारी या भारतीय चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांच्या त्या भावना पडद्यावर उतरवणं कोणत्याही अभिनेत्रीसाठी एक मोठं चॅलेंज असणार आहे. जर सर्व काही सुरळीत झालं तर लवकरच चित्रपटाचे काम सुरू होऊ शकते. बायोपिकचे दिग्दर्शन कोण करणार याबाबत काही नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. दुसरीकडे, एक OTT प्लॅटफॉर्म मीना कुमारी यांच्या जीवनावर आधारित एक वेबसीरिज आणण्याची योजना आखत आहे. ज्याची अधिकृत घोषणा आधीच झाली आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या 'मिमी' या चित्रपटाने क्रिती सेननला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या चित्रपटातील क्रितीच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर क्रितीची गणना टॉपच्या अभिनेत्रींमध्ये होऊ लागली आहे. 'मिमी'मध्ये सरोगेट आईची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटानंतर तिच्याकडे एक उत्तम अभिनेत्री म्हणून पाहिलं जात आहे. अर्थात मीना कुमारी यांच्यावर बायोपिक बनवल्यास ते तिच्यासाठी एक मोठं आव्हान असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.