मुंबई, 28 नोव्हेंबर: बाहुबली (Bahubali) सारख्या जबरदस्त चित्रपटामधून दमदार भूमिका करणाऱ्या प्रभासची (Prabhas)ख्याती फक्त दक्षिण भारतामध्येच नाही तर संपूर्ण देशभरात पसरली आहे. आदिपुरूष (Adipurush)हा प्रभासचा नवा सिनेमा येणार आहे. याबद्दल बरीच चर्चा सध्या चित्रपटसृष्टीमध्ये रंगली आहे. आदिपुरुष सिनेमामध्ये सीतेची भूमिका कोण करणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. प्रभासच्या नव्या सिनेमामध्ये अभिनेत्री कृती सेनॉन (Kriti Sanon) सीतेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
आदिपुरुष चित्रपटामध्ये प्रभास नायकाच्या भूमिकेत झळकणार आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार यावर आधीच शिक्कामोर्तब झाला होता. पण सीतेची भूमिका कोण करणार यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम होतं. आता या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आहे. या भूमिकेसाठी अनुष्का शेट्टी, अनुष्का शर्मा, कियारा अडवाणी, किर्ती सुरेश, उर्वशी रौतेला या अभिनेत्रींमध्ये रस्सीखेच होती.
View this post on Instagram
पण या सगळ्यांना पाठी टाकत कृती सेनॉनने बाजी मारली आहे. आदिपुरुष या बिग बजेट सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत करणार आहे. कृती सेनॉनने या आधी बरेली की बर्फी, लुकाछुपी, पानिपत अशा वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग जानेवारी महिन्यापासून सुरू होईल अशी चर्चा आहे. चित्रपटामध्ये VFX तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. बरीचशी दृश्य क्रोमावर शूट केली जाणार आहेत. भव्यदिव्य सेट, उत्तम दिग्दर्शक, तगडी स्टारकास्ट असे या चित्रपटाच्या जमेच्या बाजू असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.