मुंबई, 5 जून: सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अगदी अल्पावधीत एकापेक्षा एक उत्तम चित्रपट देणाऱ्या क्रिती सेननंने (Kriti Sanon) बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. सात वर्षांपूर्वी टायगर श्रॉफबरोबर तिनं 'हीरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. क्रिती सेनन तिच्या प्राणी प्रेमासाठीही ओळखली जाते. पर्यावरण संरक्षणाबाबतही ती अतिशय सजग असून भूतदया, पर्यावरण संरक्षण याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ती सतत कार्यरत असते. चित्रपटांमध्ये व्यग्र असूनही ती सोशल मीडीयावरूनही तिच्या चाहत्यांना पर्यावरण संरक्षणासाठी आवाहन करत आहे.
View this post on Instagram
झी न्यूज इंडिया डॉटकॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्यसाधून तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती काही प्राण्यांसह पोझ देताना दिसत आहे.
एका फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाचा घेरदार ड्रेस आणि त्यावर पांढरा श्रग असा पोशाख केला असून, तिच्यामागे काही निष्पर्ण झाडे दिसत आहेत. हा निसर्ग फक्त माझा किंवा तुमचा नाहीतर, आपला आहे. त्याचं रक्षण करू या, असा संदेश तिनं दिला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, चार हजारापेक्षा अधिक कमेंटस आल्या आहेत.
(हे वाचा:श्वेता तिवारीच्या मुलीचं Insta Comeback, लवकरच होणार आहे बॉलिवूडमध्ये एंट्री )
दुसर्या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या स्कर्ट ब्लाउजमध्ये असून बाजूला जिराफ (Giraffe) आहेत. तर तिसऱ्या फोटोमध्ये ती एका जीपच्या बॉनेटवर उभी राहून सिंह (Lion) आणि सिंहणीच्या जोडीकडे पहात असल्याचं दिसत आहे. या फोटोद्वारे तिनं आपलं प्राणी, निसर्ग या विषयीचं प्रेम, काळजी दर्शवली असून लोकांना पर्यावरण संरक्षणाचे (Environment) महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या सजगतेबद्दल लोकांनी तिचं कौतुक केलं आहे.
(हे वाचा:ओळखलं का या अभिनेत्रीला? हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये आहे लोकप्रिय )
क्रिती सेनन आता अनेक मोठ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. बाहुबली फेम दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत (Prabhas) ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसणार असून, राजकुमार रावसोबत ‘हम दो हमारे दो’ या विनोदी चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर नावाजलेला अभिनेता पंकज त्रिपाठीसह ‘मीमी’ तसेच अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ मध्ये आणि वरुण धवनसोबत ‘भेडीया’ चित्रपटात ती दिसणार आहे. टायगर श्रॉफबरोबर ‘गणपत’ हा तिचा दुसरा चित्रपटही लवकरच येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kriti sanon