Home /News /entertainment /

कतरिना कैफच्या घरी सेलिब्रेशन सुरु! भाऊ-बहिणींसोबत एन्जॉय करताना दिसली अभिनेत्री

कतरिना कैफच्या घरी सेलिब्रेशन सुरु! भाऊ-बहिणींसोबत एन्जॉय करताना दिसली अभिनेत्री

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) 9 डिसेंबरला पारंपारिक रितीरिवाजांनी लग्नबंधनात (Wedding) अडकणार आहेत. या जोडप्याच्या पारंपरिक लग्नापूर्वी त्यांच्या कोर्ट मॅरेजच्या बातम्या येत आहेत. कतरिना कुटुंबीयांसह मुंबईत आहे. याची पुष्टी या फोटोने केली आहे. ज्यामध्ये कतरिना तिचा भाऊ, बहीण आणि जवळच्या मित्रांसोबत दिसत आहे.

पुढे वाचा ...
   मुंबई, 5 डिसेंबर-    कतरिना कैफ   (Katrina Kaif)  आणि विकी कौशल   (Vicky Kaushal)  9 डिसेंबरला पारंपारिक रितीरिवाजांनी लग्नबंधनात   (Wedding)   अडकणार आहेत. या जोडप्याच्या पारंपरिक लग्नापूर्वी त्यांच्या कोर्ट मॅरेजच्या बातम्या येत आहेत. कतरिना कुटुंबीयांसह मुंबईत आहे. याची पुष्टी या फोटोने केली आहे. ज्यामध्ये कतरिना तिचा भाऊ, बहीण आणि जवळच्या मित्रांसोबत दिसत आहे.
  स्टार फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये कतरिना काही मुली आणि एका मुलासोबत पोज देत आहे. दोघांच्या कोर्ट मॅरेजच्या बातम्यांदरम्यान, एक व्हिडिओ देखील समोर आला होता. ज्यामध्ये कतरिना पार्टी एन्जॉय करताना दिसत होती. फोटोत दिसणारा मुलगा कतरिना कैफचा भाऊ आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'आम्ही अभिनेत्रीच्या घराबाहेर रात्रंदिवस कॅपिंग करत असताना कॅटरिना कैफचा भाऊ आज दिसला. लग्न होईपर्यंत हे सुरूच राहणार आहे. अभिनेत्रीचा तिच्या घरापासून विकी कौशलच्या घरापर्यंतचा प्रवास. दरम्यान, विकी कौशल कतरिनाच्या घरी पोहोचल्याने त्याच्या लग्नाच्या बातम्यांना अधिक हवा मिळत आहे. कारण, याआधी विकी जेव्हा-जेव्हा त्याच्या रुमर्ड गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचायचा तेव्हा तो मीडियापासून डोळे लपवताना दिसायचा. पण, यावेळी तो उघडपणे आपला आनंद व्यक्त करताना दिसला.शुक्रवारी संध्याकाळी विकी कतरिनाच्या घराबाहेर दिसला. यादरम्यान तो कॅज्युअल लूकमध्ये दिसला. यावेळी त्याने निळ्या रंगाचा स्वेटशर्ट, निळा डेनिम आणि तपकिरी टोपी घातली होती. तसेच मास्क लावला होता. गाडीतून खाली उतरल्यावर पापाराझींनी आवाज दिला आणि मीडियाला मन न दुखावता त्याने मोकळेपणाने पोझही दिली. (हे वाचा:विकी-कतरिना 9 डिसेंबरला बांधणार लग्नगाठ! ही आहे त्यांची The Untold Love Story) पिंकविलाने जवळच्या सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, जोडप्याच्या कोर्ट मॅरेजनंतर ते मित्र आणि नातेवाईकांसोबत वीकेंडला राजस्थानला रवाना होतील. कतरिना-विक्कीचा विवाह सोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथील राजेशाही थाटात होणार आहे.लग्नात हे जोडपे सब्यसाचीने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित सर्व फंक्शन्स 7 ते 10 डिसेंबरपर्यंत चालतील. लग्नात 120 पाहुणे सहभागी होणार आहेत. सर्व पाहुण्यांना कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या