Home /News /entertainment /

‘कोणी इतकं सुंदर कसं...’ कतरिनाच्या Latest फोटोंवर चाहत्यांच्या अफलातून कमेंट्स

‘कोणी इतकं सुंदर कसं...’ कतरिनाच्या Latest फोटोंवर चाहत्यांच्या अफलातून कमेंट्स

सध्या कतरिना कैफ अभिनेता सलमान खानसोबत ‘टायगर 3’च्या शुटींगसाठी तुर्कीत आहे.

    मुंबई, 5 सप्टेंबर- बॉलिवूडची (Bollywood) सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) नेहमीच आपल्या लुकने सर्वांना घायाळ करत असते. नुकताच कतरिनाने आपले काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंवर मोठ्या प्रमणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोंमध्ये ती ऑफ शोल्डर ड्रेसममध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. कतरिनाने तुर्कीमधून (Turkey) हे फोटो शेयर केले आहेत. अभिनेत्री कतरिना कैफने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेयर केले आहे. यामध्ये पर्पल रंगाच्या ऑफ शोल्डर फ्लोरल ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शिवाय फोटोत असणाऱ्या तिच्या मनमोहक हास्याने ती सर्वांनाचं घायाळ करत आहेत. कतरिनाने हे फोटो तुर्कीमधून शेयर केले आहेत. सोबतचं तिने फोटोला कॅप्शन देत. तुर्कीचा झेंडा बनवत आपलं मन तुर्कीत असल्याचं म्हटलं आहे. (हे वाचा:शरारा...शरारा, माधुरीच्या या पिंक ड्रेसची किमंत ऐकून व्हाल अवाक्  ) सध्या कतरिना कैफ अभिनेता सलमान खानसोबत ‘टायगर 3’च्या शुटींगसाठी तुर्कीत आहे. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये हे शुटींग सुरु आहे. नुकताच सलमान आणि कतरिनाने तुर्कीच्या पर्यटन मंत्र्यांची भेट घेतली होती. त्याचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. (हे वाचा:‘Bigg Boss OTT’मध्ये होणार निक्की- रुबिनाची एन्ट्री; पुन्हा करणार धम्माल  ) कतरिनाच्या ऑफ शोल्डर ड्रेसवरील फोटोंवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही युजर्सनी कतरिनाला कमेंट्स करत ‘खुपचं सुंदर’ म्हटलं आहे. काहींनी तिच्या स्माईलचं कौतुक केलं आहे. तर एका युजरने ‘इस्ट एन्ड वेस्ट कतरिना इज द बेस्ट’असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने कमेंट् करत म्हटलं आहे, ‘कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकत’ अशाप्रकारे कतरिनाचे चाहते तिच्या फोटोंना दाद देत आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Katrina kaif

    पुढील बातम्या