मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कतरिना -विकीच्या लग्नाचा असा आहे प्लॅन; पहिल्यांदा कोर्ट मॅरेज नंतर बांधणार विधिवत लग्नगाठ!

कतरिना -विकीच्या लग्नाचा असा आहे प्लॅन; पहिल्यांदा कोर्ट मॅरेज नंतर बांधणार विधिवत लग्नगाठ!

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता त्यांच्या लग्नाचा प्लॅन समोर आला आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता त्यांच्या लग्नाचा प्लॅन समोर आला आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता त्यांच्या लग्नाचा प्लॅन समोर आला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 24 नोव्हेंबर- कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नाची सर्व तयारी गुपचूप करत आहेत, मात्र सर्वांसमोर मौन बाळगून आहेत. निमंत्रण पत्रिकेपासून ते मेहंदी समारंभापर्यंत सर्व नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या लग्नाचा प्लॅन समोर आला आहे. आयुष्यभरासाठी कतरिनाच्या साथ मिळवण्यासाठी फारशी वाट न पाहता विकीने लग्नासाठी पुढील आठवड्याचा मुहूर्त पक्का केला आहे.

मुंबईत करणार कोर्ट मॅरेज

राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या भव्य लग्नाची तयारी सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही स्टार सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस हॉटेलमध्ये त्यांचे कुटुंब आणि मित्र यांच्या उपस्थितीमध्ये सात फेरे घेतील. मात्र याआधी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे त्यांच्या शाही लग्नासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. दरम्यान, लग्नाच्या सर्व तयारीसाठी त्यांची टीम पोहोचली आहे.

Vicky Kaushal, Harleen Sethi, Vicky Kaushal ex girlfriend Harleen Sethi, Vicky Kaushal-Harleen Sethi Breakup, Harleen Sethi Hollywood, Katrina Kaif, विक्की कौशल , हरलीन सेठी, विक्की कौशल की एक्स गर्लफ्रेंड

लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी स्वतंत्र इव्हेंट कंपनीला देण्यात आली आहे जबाबदारी

कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नाविषयी स्वतः काही सांगत नसले तरी त्यांची टीम लग्नाच्या प्रत्येक छोट्या विधींच्या तयारीत व्यस्त आहे. जसे विकी कधी कधी घोड्यावर बसून एंट्री घेणार, मेहंदी सोहळा कुठे होणार, कोण कोण लोक उपस्थित राहणार. सर्व टीम तयारीत गुंतलेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक इव्हेंट कंपन्या या व्हीआयपी लग्नाची व्यवस्था करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. लग्नाच्या निमित्ताने प्रत्येक विधीसाठी स्वतंत्र इव्हेंट कंपनीला जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपन्यांशी संबंधित प्रतिनिधी सवाई माधोपूर जिल्ह्यातील विविध हॉटेलमध्ये स्वत:साठी खोल्या शोधत आहेत.

Jaipur News, Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding News, Barwara Fort, Bollywood Star, Jaipur news, Rajasthan News, Jaipur latest news, Jaipur news hindi me, Jaipur news today, Jaipur news in hindi, Jaipur ki taja khabar, Jaipur ki taza khabar, Jaipur jile ke samachar, aaj ki news Jaipur, Jaipur ki taja news, राजस्थान न्यूज, जयपुर, कटरीना और विक्की की शादी, कटरीना कैफ, विक्की कौशल

कतरिना कैफच्या हातावर राजस्थानच्यासोजतची मेहंदी लावली जाणार

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे सर्व विधी अत्यंत शाही पद्धतीने होणार आहेत. लग्नात मेहंदीच्या सोहळ्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कतरिनाच्या हातात राजस्थानच्या सोजतची मेहंदी लावली जाणार आहे. यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटने सोजतचे मेहंदी व्यापारी नितेश अग्रवाल यांना मेहंदीची ऑर्डर दिली आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif