Home /News /entertainment /

Nushrratt Bharuccha Birthday: दोन हिट चित्रपट देऊनही करावा लागला संघर्ष, कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाने पालटलं नशीब

Nushrratt Bharuccha Birthday: दोन हिट चित्रपट देऊनही करावा लागला संघर्ष, कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाने पालटलं नशीब

अभिनेत्री नुसरत भरुचाने (Nushrratt Bharuccha) हळूहळू बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. पण बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली आहे. नुसरतचा एक चाहता वर्ग आहे, जो तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तयार केलाय. नुसरत भरुचाचा आज 37वा वाढदिवस (Nushrratt Bharuccha Birthday) आहे.

पुढे वाचा ...
     मुंबई, 17 मे- :   अभिनेत्री नुसरत भरुचाने (Nushrratt Bharuccha) हळूहळू बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. पण बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली आहे. नुसरतचा एक चाहता वर्ग आहे, जो तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तयार केलाय. नुसरत भरुचाचा आज 37वा वाढदिवस (Nushrratt Bharuccha Birthday) आहे. ती मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिने 'जय संतोषी माँ' या चित्रपटामधून तिच्या करिअरची सुरुवात नक्कीच केली होती; पण 'लव्ह सेक्स और धोका' या चित्रपटातून लोकांनी तिची दखल घेतली. यानंतर तिने 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' चित्रपटदेखील केला. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या नुसरत भरुचाने तिच्या करिअरमध्ये खूप संघर्ष केला आहे. चित्रपटसृष्टीतला हा प्रवास तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. एक वेळ अशीही आली होती की नुसरत भरुचाला 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी फायनल केल्यानंतर वगळण्यात आलं होतं. त्यानंतर डायरेक्टर डॅनी बॉयलच्या (Director Danny Boyle) टीमने नुसरतची माफीही मागितली होती आणि म्हटलं होतं की, सर्व प्रकारचा मेकअप आणि लूक ट्राय करूनही ती झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीसारखी दिसत नाहीये. अखेर नुसरतला चित्रपटातून बाहेर पडावं लागलं होतं. 'प्यार का पंचनामा'नंतरही संपला नाही नुसरतचा संघर्ष- यानंतर नुसरत भरुचाने 2005 ते 2010 दरम्यान चित्रपटसृष्टीत विशेष स्थान मिळवण्यासाठी संघर्ष केला. अखेर तिला एकता कपूरने 'लव्ह सेक्स और धोका'साठी साइन केलं आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण 'प्यार का पंचनामा'ने तिचं फिल्मी करिअर ट्रॅकवर आलं. 'प्यार का पंचनामा' हा त्या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातून तिला नवी ओळख मिळाली आणि नुसरत भरुचाची लोकप्रियता प्रेक्षकांमध्येही वाढू लागली. 'सोनू के टीटू की स्वीटी'ने बदललं नशीब 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' रिलीज झाल्यानंतरही नुसरतला चित्रपट मिळत राहिले पण तिचा संघर्ष संपला नाही. 2011 नंतर तिने 'आकाश वाणी' आणि 'डर@ मॉल' या चित्रपटांमध्येही काम केलं पण 2015 मध्ये 'प्यार का पंचनामा 2' रिलीज झाला जो खूप मोठा हिट ठरला होता. तरीही नुसरतचा संघर्ष मात्र संपला नाही. 2018 मध्ये 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटाने नुसरतचं नशीब बदललं. हा तिचा 100 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात तिने निगेटिव्ह भूमिका केली होती. चित्रपटातलं तिचं आणि कार्तिक आर्यनचं (Kartik Aryan) भांडण लोकांनी खूप पसंत केलं होतं. अखेर संघर्ष संपला यानंतर नुसरत भरुचाने मागे वळून पाहिलं नाही. तिचा 10 वर्षांचा संघर्ष अखेर संपुष्टात आला आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' नंतर तिला भरपूर चित्रपट मिळू लागले. 'छलांग', 'अजीब दास्तान्स' या सीरिजमधील एक चित्रपट आणि 'छोरी' सारख्या चित्रपटासाठी नुसरतचं खूप कौतुक झालं. आता अक्षय कुमारसोबत दिसणार आता नुसरत भरुचा अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) 'राम सेतू' चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय ती 'जनहित में जारी' आणि 'सेल्फी' सारख्या चित्रपटांत दिसणार आहे. नुसरत भरुचाने तिच्या कारकिर्दीत जवळपास एक दशक चांगल्या चित्रपटांमध्ये संधी मिळवण्यासाठी संघर्ष केला; पण आता तिच्या मेहनतीच्या जोरावर तिचं नशीब चमकू लागलंय, एवढं मात्र नक्की.
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या