टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार ‘हिरोईन’ या चित्रपटात करीनाने तब्बल 130 निरनिराळे ड्रेस घातले होते. आणि हे सर्वच ड्रेस टॉप डिझायनर्स कडून डिझाईन करण्यात आले होते. करीना ही पहिलीच अभिनेत्री होती, जिने एकाच चित्रपटात तब्बल 130 ड्रेस परिधान केले आहेत. यामध्ये करीना खुपचं सुंदर दिसली होती. (हे वाचा: Maharashtra Unlock: आनंदाची बातमी, लवकरच शुटिंगही होणार सुरु ) ‘हिरोईन’ हा चित्रपट एका अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित होता. एखाद्या अभिनेत्रीला यशाची कशी सवय लागते. आणि ज्यावेळी नवीन अभिनेत्री येऊ लागतात तेव्हा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो. तिचं स्टारडम कसं संपुष्टात येतं. (हे वाचा:सईचं आमरस प्रेम, 'माझा होशील ना' च्या सेटवर मिसळ आणि आमरस पार्टी, पाहा PHOTO ) तसेच तिच्या खाजगी आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो. आणि मग ती काम मिळविण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी करू शकते. त्यात तिच्या मानसिक स्तिथीवर कसा परिणाम होतो. या सर्व गोष्टी या चित्रपटात विस्ताराने मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटात सह कलाकार म्हणून करीना कपूर सोबत अभिनेता अर्जुन रामपालसुद्धा होता.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kareena Kapoor