Home /News /entertainment /

करीना कपूरने 'खास' व्यक्तीसाठी शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'माझ्याकडे लवकर परत ये'

करीना कपूरने 'खास' व्यक्तीसाठी शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'माझ्याकडे लवकर परत ये'

करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा या जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. तिच्यासाठी करीनाने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

  मुंबई, 24 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा या जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. त्यांची मैत्री खूप घट्ट आहे. विकेंडला एकत्र नाश्ता असो किंवा एकत्रित सुट्ट्यांचा आनंद घेणे असो. दोघीही अनेकवेळा एकत्र आपल्याला दिसून येत असतात. त्याचबरोबर जिमला एकत्र जाणं असो किंवा त्यांच्या मुलांना बरोबर फिरवणं असो. दोघीही अनेकदा एकत्र दिसतातच. नुकतीच करीना कपूर हिमाचल प्रदेशवरुन मुंबईला परत आली. त्यामुळे ती तिच्या जवळच्या मैत्रिणीला म्हणजेच अमृता अरोराला मिस करत आहे. अमृता नुकतीच सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेली आहे. यामुळे आपल्या मैत्रिणीची आठवण येत असलेल्या करीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अमृता अरोरा हिचा सेल्फी घेतलेला एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने गोव्याची राणी अशी कॅप्शन दिली असून, राणीचा मुकुटदेखील फोटोमध्ये दिसून येत आहे. फोटोच्या खाली लवकर ये असं कॅप्शनदेखील तिने लिहिलं आहे. करीना कपूरने ही पोस्ट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि व्हीजे असलेल्या अमृताने तत्काळ हा फोटो शेअर करत ‘तू मला खूप मिस करत आहे हे दिसत आहे’ असं लिहिलं आहे. यामध्ये हार्ट इमोजीदेखील पोस्ट केल्या आहेत. करीनाने नुकताच 'द क्वीन्स कॉमनवेल्थ निबंध स्पर्धा 2020' मध्ये एक निबंध वाचला होता. रॉयल कॉमनवेल्थ सोसायटीने 20 नोव्हेंबर रोजी प्रथमच व्हर्चुअल पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाचं आयोजन डचेस ऑफ कॉर्नवॉल, कॅमिला यांनी केलं होतं.
  करीना कपूरबरोबरच स्टीफन फ्राय, डेव्हिड वॉलियम्स आणि अलेक्झांड्रा बुर्के यासारख्या सेलिब्रिटींनीदेखील यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यांनी क्वीन्स निबंध स्पर्धेसाठी भारतातील विजेत्यांच्या निबंधांतील काही उतारे वाचले. करिनाने इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर केली असून, भारतातील विजेत्या निबंधांतील काही भाग वाचून दाखवताना नवीन अनुभव आल्याचं असं म्हटलं होतं. या संदर्भातील एक व्हिडीओ तिने पोस्ट केला होता. यामध्ये तिने या निबंध स्पर्धेत विजयी झालेल्या अनन्या मुखर्जी हिचा निबंध वाचून दाखवला. The Water’s Rise या विषयावरील निबंधाला या स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले होते. करीना कपूरने नुकतंच लालसिंग चढ्ढा या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं असून लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात करीनाबरोबर अभिनेता अमीर खानदेखील असणार आहे. त्याचबरोबर करीना कपूरचा आगामी तख्त चित्रपटदेखील तयार होण्याच्या मार्गावर आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress

  पुढील बातम्या