मुंबई, 25 जून- सोशल मीडियावर सतत कलाकारांच्या बालपणीचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. अनेक सेलिब्रेटी आपले थ्रोबॅक
(Bollywood Throwback) फोटो शेअर करत आपल्या आठवणींना उजाळा देत असतात. चाहत्यांनासुद्धा आपल्या आवडत्या कलाकारांच्या बालपणाबाबत
(Celebrity Childhood Pic) जाणून घ्यायला आवडतं. नुकतंच एका चिमुकलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही मुलगी आता एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तुम्ही ओळखलं का अभिनेत्रीला?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक गोंडस मुलगी आपल्या घराच्या गॅलरीत उभी असलेली दिसून येत आहे. तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य दिसून येत आहे. ही चिमुकली कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ही गोंडस मुलगी दुसरी कुणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर आहे. वाटलं ना आश्चर्य?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो वास्तविक करिश्माची बहीण अभिनेत्री करिना कपूरने शेअर केला आहे. आज करिश्मा कपूर आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे करिनाने बहिणीचा हा बालपणीचा फोटो शेअर करत आपला सर्वात आवडता फोटो असल्याचं सांगितलं आहे.
(हे वाचा:Karishma Kapoor Birthday: महागड्या गाड्यांची शौकीन आहे करिश्मा; चित्रपटांपासून दूर असूनही कमावते कोट्यावधी रुपये )
करिश्मा कपूरने 90 चा दशक गाजवला आहे. तिचे चित्रपट, अभिनय, डान्स आणि सौंदर्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. वयाच्या 17 व्या वर्षी तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. करिश्माने अनाडी, कुली नंबर 1, बीवी नंबर 1, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ साथ हैं, अंदाज अपना अपना, राजा हिंदुस्तानी, फिजा, जुबैदा, दिल तो पागल है यांसारख्या सुपरडुपर हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.