मुंबई, 16 मे- ‘बालपण देगा देवा’ (Childhood) असं प्रत्येकजण म्हणत असतो. बालपण असतचं तितकं गोड आणि निरागस. प्रत्येकाला आपल्या बालपणीच्या आठवणी शेयर करायला आवडत असतात. बऱ्याच वेळा आपण बालपणाच्या आठवणीत रमत असतो. कलाकारसुद्धा याला अपवाद नसतात. अनेक कलाकार सतत आपल्या बालपणीचे गोंडस फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असतात. यात बॉलिवूडची(Bollywood) बेबो करीना कपूरचासुद्धा(Kareena Kapoor) समावेश आहे. करीना सतत आपल्या बालपणीचे फोटो शेयर करत असते. त्यातला हा एक फोटो आहे. ही फोटोतील गोंडस मुलगी करीना कपूरचं आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी करीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला हा फोटो शेयर केला होता. या फोटोमध्ये करीना खुपचं गोड दिसत आहे. चाहत्यांनी सुद्धा यावर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत. करीना कपूर बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. करीनाने अनेक प्रकारच्या भूमिका करून आपलं कौशल्य सिद्ध केल आहे.
View this post on Instagram
कपूर घराण्याचं बॉलिवूडमध्ये खूप मोठं योगदान आहे. हे आपल्या सर्वांनाचं माहिती आहे. आणि याच कुटुंबात करीनाने जन्म घेतला आहे. त्यामुळे अभिनयगुण तिच्यात येणे हे साहजिकच आहे. राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर आणि सून बबिता हे करीनाचे आई वडील आहेत. करीनाच्या आई वडिलांनी सुद्धा अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तोच वारसा आता करीनासुद्धा चालवत आहे. फक्त करीनाचं नव्हे तर करिष्माने सुद्धा बॉलिवूड गाजवलं आहे.
(हे वाचा:VIDEO: Indian Idol च्या सेटवर पुण्याच्या आशिष कुलकर्णीने धरला कडकडीत 'रोजा'.. )
करीना आणि करिष्मा या दोघी बहिणींमध्ये खुपचं घट्ट बॉंन्डींग आहे. करीना लहान असल्याने सुरुवातीपासूनचं करिष्माकडून तिचे भरभरून लाड होतं असल्याचं ती नेहमीच सांगते. करीना सतत आपले आणि करिष्माचे बालपणाचे फोटो शेयर करत असते. या फोटोंमधून त्यांचं प्रेम दिसून येत असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kareena Kapoor