Home /News /entertainment /

छेड काढणाऱ्या मुलाला मुलीने धू धू धुतलं; कंगनाने शेअर केलेला व्हिडीओ एकदा बघाच !

छेड काढणाऱ्या मुलाला मुलीने धू धू धुतलं; कंगनाने शेअर केलेला व्हिडीओ एकदा बघाच !

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut)ने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच हिट होत आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर: अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कधी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या केसबद्दल तर कधी राजकारणाबद्दल किंवा नुकत्यात हाथरसमध्ये झालेल्या घटनेबद्दल कंगना नेहमीच आपली मतं ट्वीटरद्वारे मांडत असते.कंगनाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर केला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे कंगना व्यथित झाली आहे. या व्हिडीओमधून तिने महिलांना अत्याचाराविरुद्ध गप्प न बसता वाचा फोडण्याचा सल्ला दिला आहे. कंगनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, एक मुलगा एका मुलीची छेड काढत असतो. त्यावर त्या मुलीनेही गप्प न बसता त्या मुलाची धू धू धुलाई केली आहे. अनेकदा महिला समाजाच्या भीतीमुळे छेडछाडीमुळे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुलांची भीड चेपते. महिलांनी वेळीच अशा माणसांना आवर घातला पाहिजे. कंगनाने या व्हिडीओसोबत एक कॅप्शनही दिलं आहे. "प्रत्येक मुलीने हा व्हिडीओ पाहायला हवा, या मुलीने ज्याप्रकारे तिला छेडणाऱ्या मुलाची जशी धुलाई केली तसंच प्रत्येक मुलीने केलं पाहिजे. या मुलीने अगदी योग्य काम केलं आहे." कंगनाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर हिट होत आहे.आम्हीही आमच्या मुलींना या मुलीप्रमाणेच वागण्याचा सल्ला देऊ अशा कॉमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Social media, Twitter, Viral video.

    पुढील बातम्या