PM मोदींची फॅन आहे कंगना, एका अटीवर उतरणार राजकारणात?

PM मोदींची फॅन आहे कंगना, एका अटीवर उतरणार राजकारणात?

'मोदी पंतप्रधान आहेत हा त्यांचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा विजय आहे.'

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. रील लाईफप्रमाणेच रिअल लाईफमध्येही कंगणा तितकीच बेधडकपणे वागते. न्यूज इंडियाच्या रायझिंग समिट 2018 मध्ये आलेल्या कंगणाने तिच्या स्वभावाची एक झलक दाखवून दिली. यावेळी कंगणाने तिचे राजकारणाबद्दलचे विचारही मांडले.

कंगनाने म्हटले की, नॅशनलिस्ट होण्यात आणि फंडामेंटलिस्ट होण्यात फरक असतो. माझा धर्मावर विश्वास नाही, जो माझा देश आहे तिथेच मी आहे. आपल्या देशाबद्दल लाज का वाटावी? जर अमेरिका त्यांच्या राष्ट्रगीतासाठी एकत्र उभा राहत असेल तर आम्ही का नाही होऊ शकत? देशाबद्दलचं वाईट बोलणं अनेकजण सहज घेतात. तरुण पिढी सातत्याने तक्रार करते. देश घाण असेल तर तुम्ही पाहुणे आहात का? साफ करा असंही कंगनाने सांगितले.

कंगनाने सांगितले की, मला वाटतं की राजकारण एक चांगलं क्षेत्र आहे. पण त्याला चुकीचं समजलं जातं. मला अनेक नेत्यांचा फॅशन सेन्स आवडत नाही. जर ते माझा फॅशन सेन्स बदलणार नसतील तरच मला राजकारणात उतरायला काही अडचण येणार नाही असं कंगणाने सांगितले.

पंतप्रधान मोदींची चाहती असल्याचेही कंगनाने यावेळी सांगितले. मोदींचे कौतुक करताना कंगना म्हणाली की, मी मोदींची मोठी चाहती आहे. जास्त पेपर वाचत नाही पण मोदी एक यशोगाथा आहेत. एका सर्वसामान्य व्यक्तीची महत्त्वकांक्षा, एक चहावाला देशाचा पंतप्रधान आहे. हा त्यांचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. जग परिपूर्ण असू शकत नाही पण आपण त्याच्या जवळपास पोहचण्याचा प्रयत्न करु शकतो असही ती म्हणाली.

VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 08:22 AM IST

ताज्या बातम्या