Home /News /entertainment /

BREAKING: राजद्रोहाच्या आरोपांप्रकरणी कंगनाची सोमवारी चौकशी; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

BREAKING: राजद्रोहाच्या आरोपांप्रकरणी कंगनाची सोमवारी चौकशी; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangna ranaut)ची सोमवारी चौकशी होणार आहे. राजद्रोहांच्या आरोपांप्रकरणी कंगनाला हजर रहावं लागणार आहे. आता यावर कंगना पुन्हा काही प्रतिक्रिया देते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    मुंबई 21 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत(Kangna Ranaut)च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण देशद्रोहाच्या आरोपांप्रकरणी कंगना रणौतला सोमवारी चौकशीसाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर रहावं लागणार लागणार आहे. वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगना रणौत हिच्यासह तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल हिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्यानं असं म्हटलं होतं की, हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. कंगनाविरोधात भादवी कलम 153(A), 295(A), 124, 34 IPC अंतर्गत FIR दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौतने नेपोटिझम, फेव्हरेटिझम, बॉलिवूडमधील स्टार किड्स, ड्रग प्रकरण इ. अशा अनेक वक्तव्याबाबत भाष्य केले आहे. बॉलिवूडमधील अनेकांना तिने लक्ष्य केले आहे. याप्रकरणी कंगना रणौतची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood actress, Kangana ranaut

    पुढील बातम्या