मुंबई, 08 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तिचे ट्वीट सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात, ज्यामुळे नवीन वादांना देखील तोंड फुटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाबाबतही कंगनाने काही टीका करणारे ट्वीट केले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता दिलजीत दोझांझ (Diljit Dosanjh) बरोबर देखील तिचे ट्वीट-वॉर झाले होते. आता कंगनाने भारत बंद विरोधात ट्वीट केले आहे, जे खूप व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये कंगनाने सद्गुरूंचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
कंगनाने या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'चला आज भारत बंद करूया, या नावेसाठी वादळांची कमतरता नाही आहे, मात्र एक कुऱ्हाड घेऊन या, यामध्ये काही छेद देखील करुया.' अशा आशयचं एक उपहासात्मक आणि भावनिक ट्वीट कंगनानं केलं आहे.
आओ भारत को बंद कर देते हैं, यूँ तो तूफ़ानों कि कमी नहीं इस नाव को, मगर लाओ कुल्हाड़ी कुछ छेद भी कर देते हैं, रह रह के रोज़ मरती है हर उम्मीद यहाँ, देशभक्तों से कहो अपने लिए देश का एक टुकड़ा अब तुम भी माँग लो, आजाओ सड़क पे और तुम भी धरना दो, चलो आज यह क़िस्सा ही ख़त्म करते हैं 🙂 https://t.co/OXLfUWl1gb
कंगनाच्या या ट्वीटनंतर पुन्हा ट्वीट-वॉर सुरू झालं आहे. तिचे समर्थक कंगनाच्या विचारांना पाठिंबा देत आहेत तर टीकाकार टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी दिलजीत दोझांझबरोबर झालेल्या ट्वीटवॉरमध्ये कंगनाला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. कंगनाने याठिकाणी आलेल्या एका वृद्ध महिलेला 100 रुपयांच्या मजुरीवर आंदोलनासाठी आल्याचे म्हटले होते, असा आरोप अभिनेत्रीवर आरोप करण्यात आला होता. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर बराच वाद रंगला होता, अभिनेत्रीने ट्वीट देखील डिलीट केलं.