Home /News /entertainment /

कंगना रणौतने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी लिहली पोस्ट, म्हणाली...

कंगना रणौतने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी लिहली पोस्ट, म्हणाली...

राजकारणात कधी काय घडेल हे सांगणं खरंच कठीण आहे. याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांत आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठी उलथापालथ झाली.

    मुंबई, 1 जुलै-   राजकारणात कधी काय घडेल हे सांगणं खरंच कठीण आहे. याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांत आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठी उलथापालथ झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या. मात्र गुरुवारी आपल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करून, स्वतः मुख्यमंत्री होणार नाही. अशी घोषणा करत राजकीय वर्तुळात भूकंप निर्माण केला होता. आता एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने  (Kangana Ranaut)  सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. कंगना राणौत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या पोस्ट आणि वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. ती आपल्या वक्तव्यांमुळे बऱ्याचवेळा वादात अडकलेली दिसून येते. सोशल मीडियावर काही लोक तिला समर्थन करतात तर काही तिला ट्रोलदेखील करत असतात. काही वेळेपूर्वी उद्धव ठाकरेंवर आपल्या व्हिडिओतून टीका केल्यानंतर , आता कंगनाने नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत लिहलंय - 'यशाची किती प्रेरणादायी कहाणी आहे... ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत... अभिनंदन सर''.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Eknath Shinde, Entertainment, Kangana ranaut

    पुढील बातम्या