मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kangana Ranaut : कंगना करणार राजकारणात प्रवेश? शिंदेंची घेणार भेट, चर्चेला उधाण

Kangana Ranaut : कंगना करणार राजकारणात प्रवेश? शिंदेंची घेणार भेट, चर्चेला उधाण

कंगना रणौत

कंगना रणौत

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर अभिनेत्री कंगना रणौत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची भेट घेणार आहे. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून भेटीमागे काय कारण आहे हे जाणून घेण्याकडे सर्वांचं लक्ष आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 30 सप्टेंबर : बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत राजकीय वक्तव्य करण्यात कोणतीही संधी सोडत नाही. राजकारण सक्रीय असली तरी राजकारणाविषयी बोलायला कंगनाला प्रचंड आवडतं. कंगनाविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर अभिनेत्री कंगना रणौत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण मागच्या वर्षी कंगना विरुद्ध शिवसेना यांच्यात झालेला वाद सर्वश्रृत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार कंगना उद्या म्हणजेच 1 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर कंगना पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. 1 ऑक्टोबरला संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानी वर्षा बंगल्यावर कंगना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या भेटीचं मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र कंगना सदिच्छा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा - Hema Malini on Kangana Ranaut : कंगनाला मिळणार मथुरेचं तिकिट? हेमा मालिनी म्हणाल्या, 'मग राखी सावंतलाही...

2021मध्ये शिवसेना आणि कंगना यांच्यात चांगलाच संघर्ष निर्माण झाला होता. दोघांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनं कंगना रणौत हिचं जुहू येथील कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत त्यांच्यावर बुलडोझर फिरवला होता. या वाद झाला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत होते. मात्र महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि शिंदेंनी त्यांचा वेगळा गट स्थापन केला आणि आता त्यानंतर कंगना मुख्यमंत्री शिंदेची भेट घेणार आहे. त्यामुळे कंगना आणि शिंदे यांच्यात भेटीत नक्की काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कंगनानं सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

त्याचप्रमाणे मागच्या काही महिन्यांपासून अभिनेत्री कंगना राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भाजपकडून कंगनाला तिकीट मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच कंगना मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जात आहे.

First published:

Tags: Maharashtra political news, Marathi actress, Marathi news