मंदिरांना एवढं का घाबरता? शाकीब अल हसनच्या काली पूजा प्रकरणावरुन कंगना बरसली

मंदिरांना एवढं का घाबरता? शाकीब अल हसनच्या काली पूजा प्रकरणावरुन कंगना बरसली

बांगलादेशचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) ला देवीच्या पूजेला उपस्थित राहण्याबद्दल माफी मागावी लागली होती. याबाबत कंगना रणौतने (Kangana Ranaut) ट्विटरवरुन तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर: बांगलादेशचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याने माफी मागितली आहे. शाकीब अल हसन गुरुवारी भारतात बेलघाटमध्ये काली मातेजी पूजा करण्यासाठी आला होता, यानंतर तो शुक्रवारी पुन्हा बांगलादेशला परतला. यानंतर एका व्यक्तीने शाकीबला फेसबूक लाईव्ह करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत कंगना रणौतने ट्वीट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने ट्वीट केलं आहे, ‘तुम्ही मंदिरांना एवढं का घाबरता? काहीतरी कारण असेलच ना? उगाचच इतकं कोणी घाबरत नाही. आम्ही आमचं सगळं आयुष्य मशिदीत घालवलं तरी आमच्या मनातून रामाचं नाव पुसलं जाणार नाही. तुम्हाला तुमच्या श्रद्धेवर विश्वास नाही की तुमचा भूतकाळ तुम्हाला मंदिराकडे आकर्षित करतो आहे हे एकदा स्वत:लाच विचारा.’शाकीबला जी लोकं धमक्या देत होती त्यांना कंगनाने सडेतोड उत्तर दिलं आहे. कंगनाने केलेल्या ट्वीटला 18 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. आणि 3 हजारांपेक्षा जास्त लोकांनी तिचं ट्वीट रिट्विट केलं आहे. कंगनाने या विषयावर ट्विटर हँडलवरुन वेगवेगळी ट्वीट केलेली दिसत आहेत.

नक्की काय घडला होता प्रकार?

भारतात हिंदू देवीच्या पुजेसाठी गेल्यानंतर मुस्लिम बहुसंख्य देश असलेल्या बांगलादेशमध्ये शाकीबवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. नागरिकांनी इतर धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता कामा नये, अशा प्रतिक्रिया बांगलादेशमधल्या इस्लामी प्रचारकांनी दिल्या होत्या.

शकीबने मागितली होती माफी

'मी त्या कार्यक्रमात फक्त दोन मिनिटं होतो. लोकांना मी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, असं वाटत आहे. मी असं काहीही केलं नाही. एक जागरुक मुस्लिम म्हणून मी असं काहीही करणार नाही, पण मला तिकडे जाणं टाळायला पाहिजे होतं. यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो. मुस्लिम असल्यामुळे मी नेहमीच धार्मिक रिती रिवाजांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. जर मी काही चूक केली, असेल तर मला माफ करा,' असं शाकीब म्हणाला होता.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 18, 2020, 2:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading