आपल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत; रॉकेल ओतून जिवंत जाळलेल्या तरुणीसाठी कंगनाने मागितला न्याय

आपल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत; रॉकेल ओतून जिवंत जाळलेल्या तरुणीसाठी कंगनाने मागितला न्याय

'आपल्या मुलीबाळी सुरक्षित नाहीत' अशा आशयाचं ट्वीट कंगना रणौतने (Kangana Ranaut) केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर: अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा सनसनाटी ट्वीट करुन सर्वांचं लक्ष एका महत्वाच्या मुद्याकडे वेधून घेतलं आहे. 'आपल्या मुली सुरक्षित नाहीत' असं ट्वीट कंगनाने केलं आहे. बिहारमधील गुलनाज खातून खून हत्याप्रकरणाची घटना ताजी आहे. पण आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकरणाबाबत कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.कंगना ट्वीटमध्ये लिहीते, ‘आपल्या मुलीबाळी सुरक्षित नाहीत. दररोज त्यांच्यासोबत घडणाऱ्या अपराधांमध्ये वाढ होत आहे. महिलांनी एकत्र येऊन अशा नराधमांचा सामना करायला हवा. बिहारमधील गुलरेज खातूनला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा' अशी मागणी कंगनाने केली आहे.

काय घडली होती घटना?

30 ऑक्टोबर रोजी बिहारमधील रसूलपूर हबीब गावातल्या काही नराधमांनी तरुणीची छेड काढली आणि तिच्यावर कॅरोसिन ओतून तिला जिवंत जाळलं. या घटनेमध्ये मुलगी पूर्ण भाजली होती. 15 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मावळली. याप्रकरणी चंदन नावाच्या मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परंतु इतर आरोपींचा तपास अद्यापही लागलेला नाही. या प्रकरणामध्ये तपासात हयगय केल्याच्या आरोपातून तिथल्या आधीच्या SHOचं निलंबन करण्यात आलं आहे.

एका क्षुल्लक कारणावरुन आरोपींनी त्या तरुणीला चक्क जाळून टाकलं. या प्रकरणानंतर गावामध्ये खळबळ माजली होती. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या अशी मागणी गुलनाजचे कुटुंबीय करत आहेत. कंगनाने याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे.  अभिनेत्री कंगना रणौत विविध सामाजिक मुद्द्यावर आणि राजकारणावर नेहमीच ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त होत असते.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 18, 2020, 10:25 PM IST

ताज्या बातम्या