JNUची विद्यार्थीनी शहला राशिदच्या (Shehla Rashid) वडिलांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या वादात अभिनेत्री कंगना रणौतने (Kangna Ranaut) उडी घेतली आहे. तिच्या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा आहे.
मुंबई, 01 डिसेंबर: सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या चित्रपटांपेक्षा इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत असते. कधी भावाचं लग्न तर वादग्रस्त ट्वीट. यामुळे कंगना बरेचदा स्वत:वर वादही ओढवून घेते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्ती शहला राशिदच्या (Shehla Rashid) वडिलांनी सोमवारी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच तिच्या NGO ची चौकशी सुरू करावी, अशी मागणीही केली आहे. सोबतच काश्मीर खोऱ्यातल्या राजकारणात भाग घेण्यासाठी तिने मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोपही केला आहे. याप्रकरणात कंगनाने उडी घेतली आहे.
कंगनानं ट्वीट करत लिहीलं आहे की, ‘देशद्रोह केल्यावर तुम्हाला संपत्ती, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मित्र, साथी सगळं मिळेल. पण जर तुम्ही देशप्रेमी असाल तर तुमच्या वाट्याला शत्रू, संघर्ष, पूर्वजांच्या सभ्यतेचा संघर्ष तुम्हाला वारसाहक्काने मिळेल. हे तुमचं आयुष्य आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायचा आहे, समजूतदारपणे आयुष्य जगायचं की मुर्खासारखं?. मी तर जन्मत:च मूर्ख आहे’
देशद्रोह से आपको पैसा, अंतरष्ट्रिया पुरस्कार, मित्र, सहयोग सब कुछ मिलेगा, मगर देशप्रेम से आपको दुश्मन मिलेंगे,संघर्ष मिलेगा, पूर्वजों की सभ्यता की लड़ाई विरासत में मिलेगी,आपकी ज़िंदगी है आपका निर्णय होना चाहिए,समझदारी की ज़िंदगी जीनी है या मूर्खता की?
शहलाचे वडील अब्दुल राशिद शोरा यांनी पत्रकार परिषद घेत दावा केला की, ‘शहला, तिचा सुरक्षा रक्षक, बहीण आणि तिची आई यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. काश्मीरच्या राजकारणात येण्यासाठी तिने माजी आमदार इंजिनियर राशिद (Engineer Rashid) आणि व्यवसायिक जहूर वताली (Zahoor Watali) यांच्याकडून 3 कोटी रुपये घेतले आहेत.'
आरोपांवर शहलाचं उत्तर काय?
'माझ्या वडिलांनी माझ्यावर आणि माझ्या आईवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले आहेत असा व्हिडिओ तुमच्यापैकी बर्याच जणांना आला असेल. तो पत्नीला मारणारा तिचा अपमान करणारा माणूस आहे. शेवटी आम्ही त्याच्याविरूद्ध उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी केलेला स्टंट म्हणजे, आमच्या कृतीवरील प्रतिक्रिया आहे.' आता कंगनाने या प्रकरणी ट्वीट केल्याववर वेगळाच वाद उभा राहण्याची शक्यता आहे.