कंगनाच्या 'ट्वीट'मुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ; महात्मा गांधींसह नेहरूंवर साधला निशाणा

कंगनाच्या 'ट्वीट'मुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ; महात्मा गांधींसह नेहरूंवर साधला निशाणा

कंगना रणौत (Kangana Ranaut) ही सध्या आपल्या 'टिव टिव'मुळे चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही सध्या आपल्या 'टिव टिव'मुळे चर्चेत आहे. कंगनानं आता ट्वीट करून थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला आहे.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabh Bhai Patel) यांच्या जयंतीनिमित्त कंगनानं ट्वीट करून त्यांना अभिवादन केलं. मात्र, कंगनाचं हे ट्वीट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण कंगनानं सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्वीटमध्ये महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा...'शिवाजी महाराजांच्या वंशजांनी इतर समाजासाठी सुद्धा काम करावे'

वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने कंगणाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी जयंती निमित्ताने शुभेच्छा, भारताचे लोहपुरुष सरदार पटेल तुम्ही अशी व्यक्ती होतात, ज्यांनी आम्हाला आजचा अखंड भारत दिला. महात्मा गांधी यांनी खूश करण्यासाठी आपण पंतप्रधान पदाचा त्याग केला. महात्मा गांधी यांना असं वाटत होतं की, नेहरू हे उत्कृष्ट इंग्रजी बोलतात. त्यामुळे महात्मा गांधीच्या निर्णयामुळे केवळ सरदार पटेल यांनाच नाही तर संपूर्ण देशाला अनेक दशकांपर्यत नुकसान सहन करावं लागलं. आपण आपले महान नेतृत्त्व आणि दृष्टी आमच्यापासून दूर नेली. आपल्या निर्णयाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

दरम्यान, कंगनानं केलेल्या ट्वीटवर अद्याप काँग्रेसनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ट्वीट करून तिनं महात्मा गांधी आणि जवाहर नेहरुंवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस या आरोपांवर काय प्रतिक्रिया देते, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी गुजरात (Gujrat) येथील केवडियामध्ये स्टॅच्यू ऑफ यूनिटी इथं जाऊन सरदार पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मोदींनी पुलवामा हल्ला प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांमुळे नाराजी व्यक्त विरोधकांना चांगलेच फटकारलं.

'आपण सर्वांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, देशाची सुरक्षाही सर्वोच्च स्थानावर आहे. जेव्हा आपण आपल्या राष्ट्राच्या हिताबद्दल विचार करू, तेव्हा आपली प्रगती होईल. आपल्या राष्ट्राची सुरक्षा करणाऱ्या जवानांचे मनोधैर्य खचू नये, असे कोणतेही विधान राजकीय पक्षांनी करू नये. आपल्या स्वार्थासाठी केलेल्या कृत्यांमुळे देशविरोधी शक्तींना ताकद मिळेल, यामुळे देशासह तुमच्या पक्षाचेही यात नुकसान आहे', असा सल्लावजा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

हेही वाचा..धक्कादायक! विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं तरुणीची आत्महत्या

पुलवामा हल्ल्याबाबत उल्लेख करताना पंतप्रधान मोदी भावुक झाले. 'पुलवामा हल्ल्यात आपले जवान शहीद झाले, या घटनेमुळे संपूर्ण देशावर दु:ख होते. पण काही लोकं या दुखाच्या प्रसंगात सहभागी झाले नाही. ही लोकं यातही आपला स्वार्थ शोधत होती. त्यावेळी या लोकांनी कसे कसे आरोप केले हे देश विसरणार नाही. देशावर एवढे मोठे संकट कोसळले असताना राजकीय चिखलफेक करण्यात आली', असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2020, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading