'कब तक रोएगा एक छोटे से अफेयर के लिए?' हृतिकवर पुन्हा भडकली कंगना

'कब तक रोएगा एक छोटे से अफेयर के लिए?' हृतिकवर पुन्हा भडकली कंगना

सायबर सेलने इतके दिवस तपास करून आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केलेलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यातील वादाप्रकरणातील गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेच्या सीआययू (Crime Intelligence Unit) युनिटकडे देण्यात आला आहे. यानंतर आता कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

कंगना राणौतने माझी बदनामी करण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याचा आरोप करत 2016 साली हृतिक रोशनकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर सेलने इतके दिवस तपास करून आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केलेलं आहे.

या घडामोडीनंतर आता कंगनानेही हृतिकला बोचरा सवाल केला आहे. 'त्याची विचित्र गोष्ट पुन्हा सुरू झाली आहे. आमच्या ब्रेकअपला अनेक वर्ष लोटल्यानंतरही तो त्यातून बाहेर पडायला तयार होत नाही...दुसऱ्या महिलेला डेट करायला तयार होत नाही. जेव्हा मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्यासाठी धैर्य गोळा करते तेव्हा तो पुन्हा त्याचं नाटक सुरू करतो. हृतिक तू कब तक रोएगा एक छोटे से अफेयर के लिए?' असं ट्वीट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, कंगना-हृतिक प्रकरणातील तपास सायबर सेलने गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याने आणि त्यानंतर कंगनाने हृतिकला डिवचल्याने हा वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. कंगनाच्या टीकेवर हृतिक रोशन काय उत्तर देतो, हे पाहावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: December 14, 2020, 9:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या