आपली संस्कृती विसरलीस? बिकीनी फोटोवरुन नेटकऱ्यांनी कंगनाला केलं ट्रोल

आपली संस्कृती विसरलीस? बिकीनी फोटोवरुन नेटकऱ्यांनी कंगनाला केलं ट्रोल

नेहमी आपल्या संस्कृतीबद्दल बोलणाऱ्या कंगना रणौतचा (Kangana Ranaut) बिकीनी अवतार पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. शेतकरी आंदोलन असो वा घराणेशाहीवर भाष्य. ती नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडते. कंगना आता पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. याचं कारण कोणतंही वक्तव्य नाही तर एक फोटो आहे. कंगनाने शेअर केलेल्या बिकीनी फोटोमुळे ती चर्चेत आली आहे.

थलायवीचं शूटिंग संपवून कंगना सुट्या एन्जॉय करायला मेक्सिकोला गेली आहे. आपल्या भटकंतीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती चक्क बिकीनीमध्ये दिसत आहे. एरवी संस्कृतीबद्दल बोलणाऱ्या कंगनाने चक्क बिकीनी घातली म्हणून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

काय आहे कंगनाची पोस्ट?

"सुप्रात मित्रांनो, मेक्सिको जगातल्या सुंदर देशांपैकी एक देश आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही असं सुंदर देश. मेक्सिकोच्या किनाऱ्यावर काढलेला हा पहिला फोटो आहे." हा पाहून नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल करायला सुरूवात केली.

काहींनी कंगनाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. आता यावर कंगना काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कंगनाने नुकतंच तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री  जयललिता यांच्या ‘थलायवी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटात ती जयललितांची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर कंगना रणौत 'धाकड' चित्रपटात दिसणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 23, 2020, 2:56 PM IST

ताज्या बातम्या