मुंबई, 27 डिसेंबर: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. सतत कोणाशीतरी पंगा घेणारी कंगना यावेळी मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने आपल्या हायकिंगच्या फोटोंचा एक व्हिडीओ बनवला आहे आणि एक कविताही सादर केली आहे. राख असं या कवितेचं नाव आहे. या कवितेचा अर्थ अतिशय सुंदर आहे.
काय आहे कंगनाची कविता?
कंगना म्हणते, ‘मेरी राख गंगा में मत बहाना। हर नदी सागर के साथ जाकर मिलती है। मुझे सागर की गहराइयों से डर लगता है। मैं आसमान को छूना चाहती हूं। मेरी राख को पहाड़ों पर बिखेर देना।’ कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्कवर प्रचंड व्हायरल झाला आहे. कंगनाच्या या कवितेची अनेकांनी तारिफ केली आहे. एकदा पहाच कंगनाचा व्हिडीओ. तिच्याच आवाजात
View this post on Instagram
कंगनाने या आधी एक कविता लिहीली होती या कवितेचं नाव आसमान होतं.
Poem I wrote and shot this summer, as winter approaches reminiscing Aasman ❤️ pic.twitter.com/AairtGXdjh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 1, 2020
कंगनाने नुकतंच तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या ‘थलायवी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटात ती जयललितांची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर कंगना रणौत 'धाकड' चित्रपटात दिसणार आहे.