Home /News /entertainment /

पंगा क्वीन कंगना रणौत म्हणे, मी देशाची हॉटेस्ट टार्गेट; डॉन असते तर...

पंगा क्वीन कंगना रणौत म्हणे, मी देशाची हॉटेस्ट टार्गेट; डॉन असते तर...

पंगा क्वीन कंगना रणौतने (Kangana Ranaut) एक नवं ट्वीट केलं आहे. या ती म्हणते की, 'मी देशाची हॉटेस्ट टार्गेट आहे.'

    मुंबई, 06 डिसेंबर: बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut)  आपल्या भडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत मतं व्यक्त केल्यामुळे वादात अडकली आहे. तिच्या विधानांमुळे ती सध्या प्रचंड ट्रोल होत आहे. दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh), मिक्का सिंह (Mika Singh) आणि भोजपूरी अभिनेता खेसारी लाल यादव यांच्याशी नुकताच कंगनाने पंगा घेतला आहे. याबाबत कंगनाने नवं ट्वीट केलं आहे. कंगना स्वत:ला हॉटेस्ट टार्गेट म्हणवून घेते. कंगनाने ट्वीटमध्ये लिहीलं आहे, ‘मी सध्याची हॉटेस्ट टार्गेट आहे. मला टार्गेट केलं की तुम्ही मीडियामध्येही प्रसिद्ध व्हाल, मूव्ही माफिया तुम्हाला मोठ-मोठे रोल देतील, तुम्हाला नव्या फिल्म मिळतील, फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स दिले जातील.’ पुढे उपरोधित स्वरात ती लिहीते, ‘जर मी डॉन असते तर 27 प्रदेशांचे पोलीस माझ्या मागे लागले असते.’ कंगनाने या ट्वीटमधून अनेकांचा नाव न घेता समाचार घेतला आहे. अभिनेत्री कंगना रणौत  (Kangana Ranaut) आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh)  यांचं सोशल मीडियावर शाब्दिक  युद्ध चांगलंच रंगलं होतं. कंगनानं शेतकरी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर नाराजी दर्शवली. त्यावेळी दिलजीत दोसांझनंदेखील कंगनाला टार्गेट केलं होतं. तेव्हापासून त्यांच्यामध्ये Twitter War चांगलंच रंगलं होतं. गायक मिक्का सिंहनेही तिचा ट्विटवरुन समाचार घेतला होता मिक्काने लिहीलं होतं, ‘तुझं टार्गेट नक्की कोण आहे हे तरी समजू दे. तुझ्यामध्ये एवढं टॅलेंट आहे तर ते अभिनयामध्ये दाखव ना. तुझ्यात अचानक एवढी देशभक्ती कुठून जागी झाली?’ कंगनाच्या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनीही तिच्यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स केल्या आहेत.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Kangana ranaut, Twitter

    पुढील बातम्या