मुंबई, 23 नोव्हेंबर: अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) हायकोर्टात धाव घेतली आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि समजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली कंगना आणि तिच्या बहिणीवर वांद्रे पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी याप्रकरणी तिला समन्सही बजावले होते. पण भावाच्या लग्नाचं कारण देत तिने मुंबईत उपस्थित राहण्याचं टाळलं. आता प्रकरण अंगाशी यईल या भीतीने कंगनाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर (FIR) रद्द करण्याची विनंती कंगनाने याचिकेमध्ये केली आहे. कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूडमधील फिटनेस ट्रेनर मुनव्वर अली सय्यद यांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने कंगनाविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होत. न्यायायलाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगनाविरोधात भादवी कलम कलम 153 ए (धर्म, वंश इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये कलह वाढवणे), 295 ए (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतुपुरस्सर कृत्य) आणि 124-ए (देशद्रोह) आणि 34 अंतर्गत एफआयआर दाखल केली होती.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कंगना रणौतच्या भावाचं लग्न नुकतंच पार पडलं आहे. आता ती थलायवी सिनेमाच्या शूटिंगसाठी दक्षिण भरातात गेली आहे. कंगनाच्या याचिकेवर कोर्टा काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.