मनाली, 23 फेब्रुवारी : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या ट्विटरयुद्ध आणि वादग्रस्त विधानांमुळं जास्त चर्चेत असते. आता मात्र चित्रपटांसोबतच आणखी एका क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या निर्णयामुळं ती चर्चेत आली आहे.
अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आता मनाली (Manali) इथं आपला पहिला कॅफे आणि रेस्टोरंट (restaurant and cafe) उघडणार आहे. आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंगनानं मनालीमध्ये जमीनही विकत घेतली आहे. या गोष्टीची माहिती स्वतः कंगनानं सोशल मीडियावर (social media) दिली. हे रेस्टॉरंट ज्या ठिकाणी असणार आहे तिथले काही फोटोजही (photos) कंगनानं शेअर केले आहेत.
चाहत्यांसाठी हे फोटो शेअर करताना तिनं पोस्टमध्ये आपल्या टीमला या सगळ्यात केलेल्या सहकार्य आणि प्रोत्साहनासाठी धन्यवादही दिले आहेत.
Sharing my new venture my dream with you all,something which will bring us closer,other than movies my other passion food, taking baby steps in to FnB industry,building my first cafe and restaurant in Manali, thanks to my terrific team dreaming of something spectacular. Thanks 🙏 pic.twitter.com/AJT0NVPAV2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 23, 2021
तिनं लिहिलं आहे, 'मी तुम्हा सगळ्यांसह माझं नवीन व्हेंचर आणि स्वप्न शेअर करते आहे. ही गोष्ट आपल्याला आणखी जवळ आणेल. चित्रपटांव्यतिरिक्त माझं दुसरं सर्वात मोठं पॅशन आहे फूड(food). फूड अँड बेव्हरेजेसच्या व्यवसायात मी हे छोटंसं पाऊल टाकलं आहे. मनालीमध्ये मी माझं पाहिलं रेस्टॉरंट आणि कॅफे उभारणार आहे. माझ्या या स्वप्नात सोबत करण्यासाठी माझ्या टीमचं खूप आभार.'
कंगना या फोटोजमध्ये रेस्टॉरंट ज्या जागी असणार आहे तिथं उभं राहून बोलताना दिसत आहे. फोटोत तिची बहीण रांगोलीही (Sister Rangoli) दिसते आहे. मागचं दृश्य मनालीच्या निसर्गसौंदर्याचं आहे.
हेही वाचा 'चेहरे'मधून रिया चक्रवर्तीचा 'चेहरा' गायब? पोस्टर रिलीजनंतर चर्चांना उधाण
कंगना नुकतीच आपल्या आगामी 'धाकड' सिनेमाचं (Dhakad new movie) मध्य प्रदेशातील चित्रीकरण संपवून आपल्या घरी मनालीला पोचली आहे. रजनीश घई या सिनेमाला दिग्दर्शित करत आहेत. 1 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.