• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Kangana Ranaut सेलिब्रिटी असली म्हणून काय झालं? सर्वांसाठी सारखाच नियम! विमानतळावर मास्क न लावल्यानं कंगना पुन्हा ट्रोल

Kangana Ranaut सेलिब्रिटी असली म्हणून काय झालं? सर्वांसाठी सारखाच नियम! विमानतळावर मास्क न लावल्यानं कंगना पुन्हा ट्रोल

सेलिब्रिटी आहे मग ही मास्क नाही लावणार का? असं विचारत अनेक यूजर्सनी कंगनाला (Kangana Ranaut Without mask video) ट्रोल केलंय. पाहा व्हिडीओ...

 • Share this:
  मुंबई, 29 सप्टेंबर : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री Kangana Ranaut कंगना रणौत. इतर अभिनेत्री जेवढ्या चर्चेत नसतील तेवढी कंगना रणौत चर्चेत असते. कंगना दरवेळी कोणत्या न कोणत्या कारणाने ट्रोल होतच असते. कंगना सोशल मीडियावरीच बरीच सक्रिय असून ती आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मांडत असते. आणि यावरूनच ती बऱ्याचदा ट्रोल होताना दिसत असते. या उलट तीही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत असते. त्यामुळं कंगनाला ट्रोल करणं हा प्रकार काही पहिल्यांदा घडत नाहीय. काही दिवसांपूर्वी कंगनाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळचा कंगनाचा हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होताना दिसत आहे. आणि या व्हिडीओ वरून तिला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलेलं आहे.

  'तुझ्याकडून ही अपेक्षा...'अंडरवेअरच्या जाहिरातीत Rashmika Mandannaला पाहून भडकले लोक!

  विरल भयानीनं इंस्टाग्राम अकाऊंटवर कंगनाचा व्हिडीओ  शेअर केला आणि तो अर्थातच व्हायरल झाला. हल्लीच काही दिवसांपूर्वी कंगनाला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यादरम्यान सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कंगनाचा हा विमानतळावरचा  Kangana Ranaut Latest Without Mask व्हिडीओ शेअर केला. यात तिनं पांढऱ्या रंगाचा सलवार सूट आणि चेहऱ्यावर ब्लॅक गॉगल घातलेला दिसला. मात्र यावेळी कंगनाने या व्हिडिओमध्ये मास्क न घातल्याचं दिसतंय. त्यामुळेच नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा चांगलाच ट्रोल केलं आहे. एअरपोर्टच्या समोरील बोर्डवर ‘नो मास्क नो एण्ट्री’ लिहिले असूनही तिनं विना मास्क प्रवेश केला. यावरूनच कंगनाच्या या कृत्यावर तिला चांगलाच टोला लगावला जात आहे. ती या व्हिडिओमध्ये अशी काही थाटामाटात चालतेय की, ती एक महाराणी आहे.
  या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केले असे काही कमेंट... व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला कमेंट मध्ये “नो मास्क नो एण्ट्री ' हा नियम सर्वांसाठी आहे. मग ही काय महाराणी आहे का? तर दुसऱ्या युजरने , ही सेलिब्रिटी आहे म्हणून ही मास्क नाही लावणार का ? आणि अजून एक युजर म्हणाला, “व्वा नो मास्क नो एण्ट्रकडे काय ही अशी दूर्लक्ष करतेय, जस की ही मोठी राजकारणीय पक्ष पार्टी जिंकली आहे. असे कमेंट करत चांगलाच टोला लगावला आहे. नुकताच कंगना रणौतचा Thalaivi ‘थलायवी’ हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी तिला या भूमिकेत भरभरून प्रेम आणि ही भूमिका उत्तमपणे साकारली आहे, असे तिचे कौतुकही केले जात आहे.
  Published by:Trending Desk
  First published: