Home /News /entertainment /

सलमान खाननंतर काजोलनं रेंटवर दिलं घर; महिन्याला घेणार इतकं भाडं

सलमान खाननंतर काजोलनं रेंटवर दिलं घर; महिन्याला घेणार इतकं भाडं

काजोल (Kajol) ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल ही पती अजय देवगणसोबत (Ajay Devgn) जुहू येथील त्यांच्या आलिशान बंगल्यात राहते.

  मुंबई, 19 डिसेंबर-   काजोल   (Kajol)   ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल ही पती अजय देवगणसोबत (Ajay Devgn)  जुहू येथील त्यांच्या आलिशान बंगल्यात राहते. असे अनेक बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांच्याकडे एक नाही तर अनेक लग्जरी घर आहेत आणि अनेक कलाकारांनी आपली घरं भाड्यानं दिली आहेत. आता या यादीत काजोलच्या नावाचाही समावेश झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काजोलनं आपलं पवईमधील घर भाड्यानं  (Kajol Rents Out Her Powai Apartment)   दिलं आहे. काजोलची ही संपत्ती ७७१ स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेली आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, हे अपार्टमेंट हिरानंदानी गार्डन्सच्या अटलांटिक प्रोजेक्टच्या 21व्या मजल्यावर आहे. या अपार्टमेंटचा भाडेपट्टा आणि परवाना करार 3 डिसेंबर रोजी नोंदणीकृत झाला आहे. यानुसार, अभिनेत्रीला सध्या महिन्याला ९० हजार रुपये भाडं मिळणार आहे. कागदपत्रांनुसार भाडेकरूनं 3 लाख रुपये सुरक्षा रक्कम जमा केली आहे. एक वर्षानंतर भाडं वाढवलं ​​जाईल. एका वर्षानंतर 96,750 रुपये इतकं भाडं प्रत्येक महिन्याला असणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Kajol Devgan (@kajol)

  तसेच अभिनेत्री काजोलसुद्धा एका आलिशान घरात राहते हे सर्वांनाच माहिती आहे. काजोल ज्या आलिशान बंगल्यात अजय देवगण आणि तिच्या मुलांसोबत राहते, त्या बंगल्याचं नाव 'शिवशक्ती' असं आहे. हा आलिशान बंगला 590 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला आहे. हा बांगला अजय देववगणनं सुमारे 60 कोटींना विकत घेतला होता. काजोलच्या आधी प्रियांका चोप्रा, अमिताभ बच्चन, सलमान खानसह अनेक कलाकारांनी त्यांचं घर भाड्यानं दिलं आहे. जॅकलिन फर्नांडिस ही प्रियांका चोप्राची भाडेकरू आहे. त्याच वेळी, अमिताभ बच्चन यांनी त्यांचं एक डुप्लेक्स अपार्टमेंट अभिनेत्री क्रिती सेननला 10 लाख रुपये प्रति महिना भाड्यानं दिलं आहे. सलमान खाननं वांद्रे पश्चिम येथील शिवस्थान हाइट्समध्ये आपला अपार्टमेंट भाड्यानं दिला आहे. हे घर त्यांनी महिन्याला ९५ हजार रुपये भाड्यानं दिल्याची चर्चा आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Ajay devgan, Entertainment

  पुढील बातम्या