Home /News /entertainment /

अभिनेत्री काजल अग्रवाल मुंबईतील या उद्योगपतीशी बांधणार लग्नगाठ?

अभिनेत्री काजल अग्रवाल मुंबईतील या उद्योगपतीशी बांधणार लग्नगाठ?

दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Agrawal) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, अशी बातमी समोर येत आहे.

  मुंबई, 06 ऑक्टोबर : दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Agrawal) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, अशी बातमी समोर येत आहे. मीडिया अहवालानुसार काजल गौतम किचलू (Gautam Kitchlu) या उद्योगपतीशी लग्नगाठ बांधणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलूगू चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली काजल लग्न करतेय म्हटल्यावर तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र याबाबत अद्याप काजल किंवा गौतम यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार काजल आणि गौतम गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबीयांसोबर काही मंदिरांना भेटी देताना पाहायला मिळाले. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरीही चाहत्यांकडून काजलला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा मिळत आहेत. काजलने इन्स्टाग्रामवर सोमवारी एक पोस्ट केली आहे, ज्यात तिने केवळ एक हार्ट इमेज पोस्ट केली आहे. त्यावर देखील तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

  मीडिया अहवालानुसार मोठ्या धुमधडाक्यात काजलचं लग्न होणार आहे. लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात पार पडणारं हे पहिल सेलिब्रिटी वेडिंग असेल. गौतम एक बिझनेसमन, इंटिरियर डिझायनर आहे. या लग्नामध्ये केवळ कुटुंबातील सदस्यांना निमंत्रण असेल, अशी देखील माहिती समोर येते आहे. काजलने 'क्यों हो गया ना' या सिनेमातून 2004 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ऐश्वर्या राय-बच्चन आणि विवेक ऑबेरॉय स्टारर या सिनेमात तिने ऐश्वर्याच्या बहिणीची भूमिका केली होती. (हे वाचा-सोनू सूद काहीही करू शकतो! ऑनलाइन शिक्षणासाठी गावात थेट बसवला टॉवर) त्यानंतर तिने दाक्षिणात्य सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला.  दक्षिणेत काजलची मोठी फॅन फॉलोइंग आहे. 2011मध्ये 'सिंघम' मुळे ती पुन्हा एकदा हिंदी सिनेमात प्रकाशझोतात आली. काजल आता 'मुंबई सागा' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress

  पुढील बातम्या