मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /जया प्रदा यांना चालत्या ट्रेनमध्ये करावी लागली होती अंघोळ; या कारणामुळे आली अशी वेळ

जया प्रदा यांना चालत्या ट्रेनमध्ये करावी लागली होती अंघोळ; या कारणामुळे आली अशी वेळ

जया यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होत की, 'एकदा मला ट्रेन मध्ये अंघोळ करावी लागली कारण आम्हला लोकेशन पोहोचताच शूटिंग करायचं होतं.'

जया यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होत की, 'एकदा मला ट्रेन मध्ये अंघोळ करावी लागली कारण आम्हला लोकेशन पोहोचताच शूटिंग करायचं होतं.'

जया यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होत की, 'एकदा मला ट्रेन मध्ये अंघोळ करावी लागली कारण आम्हला लोकेशन पोहोचताच शूटिंग करायचं होतं.'

    मुंबई 30 जुलै: बॉलिवूडचा एक जमाना होता जेव्हा नृत्यातील पारंगत अभिनेत्रींचा मोठा नावलौकिक होता. जया प्रदा (Jaya Prada), हेमा मालिनी (Hema Malini) , माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Sheshadri) या अभिनेत्रींनी त्या काळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. या अभिनेत्री शास्त्रीय नृत्यात पारंगत होत्या. त्यातील जया प्रदा या आंध्र प्रदेशच्या राहणाऱ्या होत्या. त्यांच्या नृत्यमुळेच त्यांना चित्रपटात ऑफर्स मिळाल्या होत्या. जया यांच्या आईने लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि संगीताचे धडे दिले होते. एकदा जया यांनी शाळेच्या अन्युअल फंक्शन मध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी तिथे उपस्थित एका दिग्दर्शकाची नजर जया यांच्या नृत्यशैलीवर पडली होती. आणि त्यानंतर त्यांना एका साऊथ चित्रपटाची ऑफर मिळाली. तेलुगू चित्रपट  ‘भूमि कोसम’ मध्ये त्यांनी पहिल्या चित्रपटात काम केलं.

    अनेक तेलगू, तमिल आणि कन्नड़ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर जया यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यावेळी त्यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये मोठा धमाका केला होता. जया यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्यावेळी बोलबाला असणाऱ्या बाबी, राखी, जीनत अमान यासारख्या अभिनेत्रींची जादू कमी होऊ लागली होती.  1979 साली दिग्दर्शक विश्वनाथ यांनी ‘सरगम’ हा चित्रपट केला. चित्रपट इतका हीट झाला की जया रात्रीतून स्टार झाल्या.

    हे वाचा-'मनोज वाजपेयी चारित्र्यहीन माणूस'; सुनील पालच्या टीकेवर अभिनेत्याचं सणसणीत उत्तर

    चित्रपटांसाठी जया फार मेहनत घ्यायच्या. कोणत्याही परिस्थितीत हार मानत नव्हत्या. त्या जमान्यात आजच्या सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे शूटिंगच्या वेळेचं विशेष भान राखलं जायचं. अशावेळी अभिनेत्रींना मोठ्या संकटाना तोंड द्यावं लागायचं.

    हा जया आणि ऋषी कपूर यांचा सुपरहिट चित्रपट होता. त्यातील  ‘डफलीवाले डफली बजा…’ हे गाणं आजही श्रोत्यांच्या ओठांवर गुणगुणायला मिळतं इतकं सुपरहिट झालं होतं. त्यातीलच एक किस्सा जया यांनी एकदा सांगितला होता जेव्हा त्यांना चालत्या ट्रेनमध्ये अंघोळ करावी लागली होती.

    हे वाचा-'तू माझं पहिलं प्रेम'; निलपरी अमृता खानविलकरला पाहून त्यानं सांगितलं गुपित

    जया यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होत की, 'एकदा मला ट्रेन मध्ये अंघोळ करावी लागली कारण आम्हला लोकेशन पोहोचताच शूटिंग करायचं होतं. दिग्दर्शकांना सकाळच्या पहिल्या सूर्यप्रकाशातच सिन शुट करायचा होता. मी 24 तास काम करायची. मी स्वतःच मेकअप करायला शिकले होते. गरजेनुसार आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावं लागायचं. कोणकोणत्या परिस्थितीत आम्ही शुट केलं आहे. आज जेव्हा मी ऐकते की व्हॅनिटी व्हॅन नसल्याने मुली शूटिंग साठी सहकार्य करत नाहीत. तेव्हा माझं डोकं फारच खराब होतं."

    First published:
    top videos

      Tags: Bollywood, Bollywood actress