चाहत्यांना घायाळ करणारा जान्हवी कपूरचा Belly Dance, करीनाच्या गाण्यावर केलेला डान्स Video व्हायरल

चाहत्यांना घायाळ करणारा जान्हवी कपूरचा Belly Dance, करीनाच्या गाण्यावर केलेला डान्स Video व्हायरल

जान्हवी कपूर (janhvi kapoor) सध्या पंजाबमध्ये (Panjab) आपला आगामी चित्रपट 'गुड लक जेरी' (Good luck jerry) या चित्रपटाच्या शुटींगमध्ये (Shooting) व्यग्र आहे. तिनं नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. यामध्ये जान्हवीच्या बेली डान्स मुव्ह्ज पाहून चाहते फिदा झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी: बॉलिवूडमधील (Bollywood) पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवीच्या (Shreedevi) डान्सचे (dance) लाखो चाहते होते. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरही (Janhvi kapoor) चित्रपट सृष्टीत तिचं नाव कमावत आहे. दरम्यान सोशल मीडियावरही जान्हवी खूप सक्रीय आहे. जान्हवी कपूरने नुकताच इन्स्टाग्रामवर आपला एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यातून स्पष्ट होतं की, तिनेही आपल्या आईचे डान्सचे गुण आत्मसात केले आहेत. या व्हिडीओमध्ये जान्हवी बेली डान्स (Belly dance) करताना दिसत आहे.

जान्हवी सध्या पंजाबमध्ये आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यावेळी तिनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor Khan) यांच्या 'अशोका' चित्रपटातील 'सन सन ननन..' या गाण्यावर बेले डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओ शेअर करत असताना तिनं कॅपशनमध्ये लिहिलं की, बेली डान्सचे क्लास मिस करत आहे.

अलिकडच्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत राहिली आहे. अलीकडेच तिने कार्तिक आर्यनसोबत गोव्यात सुट्टी साजरी करताना दिसली आहे. त्यामुळं बॉलिवूडमधील ही नवी जोड रिलेशनशिप जाण्यासाठी तयार झाल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. जान्हवी आणि कार्तिक आर्यन 'दोस्ताना 2' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

तिच्या लव्ह लाइफ व्यतिरिक्त ती आणखी एका कारणासाठी चर्चेत होती. जान्हवी कपूरने नुकतचं एक नवीन घर विकत घेतलं आहे, त्यामुळं ती चर्चेत आली होती. मुंबईतील जुहू भागात जान्हवीनं तीन मजल्याचं घर विकत घेतल्याची बातमी आहे. वृत्तानुसार, तिने या घरासाठी 39 कोटी रुपये मोजले आहेत. जान्हवीने या घराचा खरेदीचा करार 7 डिसेंबर रोजी अंतिम केला आहे.

Published by: News18 Desk
First published: January 12, 2021, 9:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading