Home /News /entertainment /

जान्हवी कपूरच्या अ‍ॅटिट्यूडवर भडकले युजर्स; VIRAL VIDEO मुळे अभिनेत्री झाली ट्रोल

जान्हवी कपूरच्या अ‍ॅटिट्यूडवर भडकले युजर्स; VIRAL VIDEO मुळे अभिनेत्री झाली ट्रोल

जान्हवी कपूर ही एक अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

   मुंबई, 4 डिसेंबर-   जान्हवी कपूर   (Janhavi Kapoor)   ही एक अशी बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जान्हवी कपूरला प्रवास करायला किती आवडते? आपण हे अलीकडेच पाहिले जेव्हा ती सारा अली खानसोबत केदारनाथला भेट देण्यासाठी गेली होती. येताच नंतर पुन्हा बहीण खुशी कपूरसोबत दुबईमध्ये खूप मजा करताना दिसली. आता पापा बोनी कपूर यांच्या 'मिली' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर जान्हवी पुन्हा एकदा मित्रांसोबत रात्री उशिरा मजामस्ती करताना दिसली.पण यादरम्यान तिने असे काही केले की पुन्हा जान्हवी कपूर सोशल मीडियावर ट्रोल   (Trolle)  झाली.
  जान्हवी कपूर शुक्रवारी रात्री तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती. काळ्या कटआउट शॉर्ट ड्रेसमध्ये हसत, जान्हवी परत तिच्या कारमध्ये बसून मैत्रीणीसोबत मजामस्ती करत होती. तिला पाहताच तेथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी तिला पोज देण्यास सांगितले. मात्र तिने पापाराझींना असे उत्तर दिले. जे लोकांना अजिबात आवडले नाही. आणि लोकांनी तिला ट्रोल करत सोशल मीडियावर तिची शाळा घेतली. प्रसिद्ध सेलिब्रिटी पापाराझी विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूर तिच्या कारकडे जात तिच्या मैत्रिणींना यायला सांगते. यासोबतच ती तिचा मास्कही मागते. जान्हवीला काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस आणि हाय हील्समध्ये पाहून पापाराझी तिला फोटो क्लिक करायला सांगतात. तेव्हाच ती गाडीत बसताना त्यांना उत्तर देते, 'सॉरी आता उशीर होत आहे.' (हे वाचा:सारा अली खानने हरवला फोन; लक्षात येताच अभिनेत्रीची उडाली तारांबळ, पाहा VIDEO ) जान्हवीचे हे उत्तर लोकांना आवडले नाही. सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत की जान्हवीमध्ये खूप ऍटिट्यूड आला आहे. एका युजरने लिहिले - मॅडमचा ऍटिट्यूड तर पाहा. एका यूजरने लिहिले - 'लोक हिला का फॉलो करतात. आम्हाला ती अजिबात आवडत नाही.' दुसऱ्याने लिहिले -' जेव्हा तासंतास बाहेर असते तेव्हा उशीर होत नाही. आणि एक फोटो क्लिक करताना उशीर होत आहे'. त्याचवेळी एका यूजरने अभिनेत्रीच्या शॉर्ट ड्रेसवर कमेंट केली. त्याने लिहिले- 'ती तिची पॅन्ट विसरली आहे'.तिच्या ओव्हर अॅक्टिंगवर एका यूजरने लिहिले - 'अभिनेत्री असे वागतात जसे ते त्यांचे मित्र किंवा कार शोधत आहेत, पापाराझींना 360 कोनातून त्यांचा पोशाख दाखवण्याचा हा एक मार्ग आहे.'
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Janhavi kapoor

  पुढील बातम्या