'आम्ही यापेक्षा चांगलं केलं असतं पण...', संचारबंदीत पार्टी VIDEO मुळे जान्हवी कपूर चर्चेत

'आम्ही यापेक्षा चांगलं केलं असतं पण...', संचारबंदीत पार्टी VIDEO मुळे जान्हवी कपूर चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhavi Kapoor) मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करतानाचा हा व्हिडीओ बराच व्हायरल होतो आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : मुंबईसह देशभरात कोरोनाचा (corona) कहर सुरू आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनसारखे (Maharashtra lockdown) कडक निर्बंध लावण्यात आला आहे. पण बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मात्र (Janhavi Kapoor) अशा परिस्थितीतही  मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूरने स्वत:च हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओत ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी (party with friends)  करत डान्स करत आहे. कार्डी बीच्या अप गाण्यावर सगळ्यांनीच ताल धरला होता. हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांनाही चांगलाच आवडला आहे. पण अनेकांनी तिला लॉकडाऊनचा नियम समजावून सांगण्यचाही प्रयत्न केला.

मुंबईत कर्फ्यू (Mumbai curfew) लावलेला असून कलम 144 (section 144 imposed) देखील लावण्यात आलं आहे. पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे. पण अशातच जान्हवीने हा व्हिडीओ पोस्ट केल्याने अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे वाचा - ‘आता कोणाच्या पैशांवर मजा मारतेयस?’; विमानतळावर रियाला पाहून प्रेक्षक संतापले

जान्हवीच्या या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. तिच्या या व्हिडीओची वाहवा केली आहे. या पार्टीमध्ये तिची फिटनेस ट्रेनर (fitness trainer)  तसंच तिच्या टिममधील काही लोक आहेत. एका हॉटेलमधील पूल पार्टीचा (pool party) हा व्हिडीओ आहे. सगळेच जण स्विमिंग पूलशेजारी डान्स करत आहेत. जान्हवीने या व्हिडीओला एक कॅप्शनदेखील दिलं आहे, 'मला खरंच वाटतं आम्ही यापेक्षा चांगलं करू शकलो असतो, पण... 'असं ती म्हणाली.

हे वाचा - नोरा फतेहीच्या डान्सला आई-वडिलांचा होता विरोध; केवळ 5 हजारांत सोडलं घर

अभिनेत्री श्रीदेवीची (Shreedevi) कन्या जान्हवीचा नुकताच 'रुही' (Ruhi)  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला चांगला प्रतिसाद देखिल मिळाला होता. यानंतर जान्हवी ‘दोस्ताना 2’ (Dostana 2) या चित्रपटात दिसणार आहे.

Published by: News Digital
First published: April 17, 2021, 12:33 PM IST

ताज्या बातम्या