मानसिक समस्येचा सामना करतेय ही अभिनेत्री; कशी देतेय लढा पाहा VIDEO

मानसिक समस्येचा सामना करतेय ही अभिनेत्री; कशी देतेय लढा पाहा VIDEO

या अभिनेत्रीने आपल्याला एन्झायटी (Anxiety) असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) आत्महत्येनंतर तो डिप्रेशनमध्ये (depression) असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबाबत (mental health) चर्चा सुरू झाली. दरम्यान याआधी दीपिका पदुकोननेही डिप्रेशनचा सामना केला आहे. शिवाय इतर काही कलाकारही आपल्या मानसिक आरोग्याबाबत व्यक्त झाले आहेत. आता कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. मग ती सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. नुकतंच एका अभिनेत्रीने आपल्या मानसिक आरोग्याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. आपल्याला एन्झायटी (Anxiety) असल्याचं तिनं सांगितलं.

एन्झायटी ही एक मानसकि समस्या आहे, ज्यामध्ये भीती, चिंता वाटू लागते. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या या मानसिक समस्येचा सामना करत आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांना ही माहिती दिली आणि यातून बाहेर पडण्यासाठी ती काय करते आहे, कसे प्रयत्न करत आहे तेदेखील तिनं सांगितलं.

जॅकलीनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती योगा करताना दिसते आहे. या पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे. "गेल्या काही दिवसांपासून मी एन्झायटीशी झुंजत आहे. मात्र यादरम्यान मी सातत्याने योगा करते आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा धजा मी घेतला आहे. यापेक्षा अधिक काय गरजेचं आहे हेदेखील मी शिकले", जॅकलीनने आयुष्याचे आभारही मानलेत.

या व्हिडीओत जॅकलीन प्रोफेशनल योगा आसन करताना दिसते आहे. ज्यावरून ती योगाचा सातत्याने अभ्यास करत असल्याचं दिसून येतं.

हे वाचा - सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड ट्रोल; आता घेतला हा निर्णय

लॉकडाऊनमध्ये जॅकलीन सलमान खानसह तेरे बिना गाण्यात दिसून आली. त्याआधी रॅपर बादशाहसह गेंदा फूल गाण्यात दिसली. तिची ही गाणी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. चित्रपटाच्या बाबतीत म्हणायचं तर जॅकलीन मिसेज प्रोफेशनल सीरियल किलर या चित्रपटात शेवटची दिसली. तिचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. यानंतर जॅकलीन आता अटॅकमध्ये दिसणार आहे.

Published by: Priya Lad
First published: July 9, 2020, 10:50 PM IST

ताज्या बातम्या