Home /News /entertainment /

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात केलं दाखल

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात केलं दाखल

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) आई किम फर्नांडिस यांना हृदयविकाराचा झटका (Jacqueline Fernandez Mother Heart Stroke) आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    मुंबई, 4 जानेवारी-  बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची   (Jacqueline Fernandez)   आई किम फर्नांडिस यांना हृदयविकाराचा झटका  (Jacqueline Fernandez Mother Heart Stroke)  आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना बहरीनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जॅकलिनचे आई-वडील बहरीनमध्ये राहतात. तर अभिनेत्री मुंबईत राहते. जॅकलीन तिच्या आईच्या खूप जवळ आहे. ती अनेकदा तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असते. गेल्या वर्षी ख्रिसमस साजरा करण्यासाठी ती तिच्या आई वडीलांकडे निघाली होती. परंतु मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे तिला एयरपोर्टवरच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. महाठग सुकेश चंद्रशेखरच्या  (Sukesh Chandrashekhar)  मनी लॉन्ड्रिंग  (money laundering)  प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर अभिनेत्री मोठ्या चर्चेत आली आहे. तसेच जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतकंच नव्हे तर त्याने अभिनेत्रीला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचं उघड झालं होतं. नुकताच जरी केलेल्या एका निवेदनात सुकेश चंद्रशेखरने आपलं आणि जॅकलिनचं एक नातं असलायचं म्हटलं होतं. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. भेटवस्तू देण्यासोबतच सुकेशनं जॅकलिनच्या अनेक चित्रपटांची निर्मिती करण्याचं आश्वासनही दिल्याचं म्हटलं जात आहे. सुकेशनं जॅकलीनला सांगितलं होतं की, तो 500 कोटी रुपयांचा तीन भागांचा वुमेन सुपरहिरो चित्रपट तयार करेल ज्यामध्ये जॅकलीन मुख्य भूमिकेत असेल.“हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रित केला जाईल. त्यानं जॅकलीनला सांगितलं होतं की ती हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखीच आहे. ती सुपरहिरो चित्रपटात मुख्य भूमिकेला पात्र आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Jacqueline fernandez

    पुढील बातम्या