मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हॉलीवूडच्या Women stories मध्ये झळकणार ही बॉलिवूड अभिनेत्री; भारतात होईल शूटिंग

हॉलीवूडच्या Women stories मध्ये झळकणार ही बॉलिवूड अभिनेत्री; भारतात होईल शूटिंग

दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा पाठोपाठ आता आणखी एक बॉलिवूडची लीडिंज लेडी हॉलिवूडच्या पडद्यावर झळकणार आहे. Women Stories या चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारच्या 6 कथा सांधलेल्या दिसणार आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 26 जानेवारी: प्रियांका चोप्रा (Priyanaka Chopra) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्यानंतर आता बॉलिवूडमधील (Bollywood) आणखी एक अभिनेत्री हॉलिवूडमध्ये (Hollywood) झळकणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज Jacqueline Fernandez) आता लवकरच 'वूमन स्टोरीज' (Women Stories) या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण (Debut) करणार आहे.

'वूमन स्टोरीज' हा चित्रपट वेगवेगळ्या जॉनरच्या 6 कथा असलेला चित्रपट आहे. त्यातील एका कथेत जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लीना यादव करणार आहेत. लीना यादव यांनी यापूर्वी पार्च्ड, राजमा चावल आणि तीन पत्ती यांसारखे अप्रतिम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'वूमन स्टोरीज' या चित्रपटातील जॅकलीनच्या भागाचे नाव 'शेअरींग अ राइड' असं आहे. यामध्ये ती ट्रान्सजेंडर मॉडेल अंजली लामाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'वूमन स्टोरीज' या चित्रपटाचं चित्रीकरण इटली, भारत आणि अमेरिकेत केलं जाणार आहे. या चित्रपटाला लैंगिक समानतेसाठी काम करणारी संस्था 'वी टू इट टुगेदर' ने पाठींबा दिला आहे. यापूर्वी जॅकलीनने 2015 साली एका ब्रिटिश चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाचं नाव 'डेफिनेशन ऑफ फियर' असं असून हा एक हॉरर आणि थ्रिलर चित्रपट होता. हा चित्रपट 5 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला होता.

2009 मध्ये जॅकलीनने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सध्याच्या घडीला जॅकलीन फर्नांडिस बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. जॅकलिनने मॉडेलिंगपासून चित्रपट विश्वात प्रवेश केला होता. आता ती अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'बच्चन पांडे' या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. त्याचबरोबर जॅकलीन जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. याव्यतिरिक्त 'भूत पोलीस' चित्रपटातही जॅकलीनची भूमिका असणार आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Hollywood